Diwali Discount On Aprilia Bike RS 457 : आपल्यातील अनेक जणांना महागड्या गाड्या खरेदी करण्याची प्रचंड आवड असते. किंमत कितीही असली तरीही महागडी गाडी खरेदी करण्यास आपण मागे पुढे पाहत नाही. तर हे लक्षात घेऊन इटालियन बाईक निर्माता एप्रिलिया (Aprilia) भारतातील ग्राहकांसाठी डिस्काउंट घेऊन आली आहे. ज्यांना मिड लेव्हल स्पोर्ट्स मोटरसायकल प्रचंड आवडते त्यांच्यासाठी ही ऑफर खूप खास (Diwali Discount On Aprilia Bike) ठरणार आहे. पण, ही ऑफर फक्त आणि फक्त ३१ ऑक्टोबरपर्यंत मर्यादित असणार आहे.

Aprilia ने भारतीय बाजारपेठेत स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये आरएस ४५७ (RS 457) बाईकवर ऑफर देते आहे. नवीन दिवाळी ऑफर्ससह या बाईकची किंमत ४.१७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याचबरोबर काही खास गोष्टीसुद्धा ग्राहकांना दिल्या जाणार आहेत. ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि मागणीला प्रतिसाद म्हणून, Aprilia बाईक खरेदीवर क्विक शिफ्टर देणार आहे, तर ग्राहकांना फ्री रोडसाइड असिस्टेंस (रोडच्या कडेला मोफत मदत), तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना फ्लेक्सिबल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही झिरो डाउन पेमेंटसह किंवा ८.९९% व्याज दराने ही बाईक खरेदी करू शकता.

TVS Raider iGO variant launched know its features price mileage and ride modes
बजाज पल्सरला टक्कर द्यायला आली ‘TVS’ची ही बाईक, जास्त मायलेजसह मिळतील खास फिचर्स
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Royal Enfield Interceptor Bear 650 unveiled price features and performance will launch soon in india
नाद करायचा नाय! Royal Enfield आणतेय ‘ही’ नवीकोरी बाईक, कमाल फिचर्स, दमदार परफॉरमन्स अन् किंमत…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Diwali Festival Discounts Best time to buy TVS iQube
Diwali Festival Discounts: हीच आहे TVS iQube खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ, आताच करा बुक
Royal Enfield Goan Classic 350
Royal Enfield Goan Classic 350 नोव्हेंबरमध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स अन् डिझाइन

हेही वाचा…BYD Seal offers : ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तीन वर्षांची सर्व्हिस, मेन्टेनन्स पॅकेज फ्री! वाचा सिंगल चार्जिंगमध्ये किती देते रेंज

फीचर्स :

Aprilia च्या RS457 मध्ये 457 cc चा पॅरलल ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जो 9,400 rpm वर 46.7 bhp आणि 6,700 rpm वर 43.5 Nm मीटरचा टॉर्क मिळतो. याला ६ स्पीड गिअरबॉक्स जोडलेले आहे. यात 41 mm च्या अपसाइड-डाऊन फ्रंट फोर्कसह 120 mm चा ट्रॅव्हल आणि 130 mm चा व्हील ट्रॅव्हल असलेला मोनोशॉक आहे. यात एलईडी लाइट्स, ट्रॅक्शन कंट्रोल, डुअल-चॅनेल एबीएस, तीन राइडिंग मोड्स आणि ५ इंच टीएफटी स्क्रीनदेखील आहे.

आरएस ४५७ बाईकवर (RS457) डिस्काउंट लाँच केल्यानंतर (Diwali Discount On Aprilia Bike), EVP, टू-व्हीलर डोमेस्टिक बिझनेस, Piaggio Vehicles Pvt Ltd अजय रघुवंशी म्हणाले की, “Aprilia RS457″ ला प्रतिसाद दिला आहे आणि ग्राहकांनी दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, यामुळे आमच्या ग्राहकांची दिवाळी खास होण्यासाठी आम्ही Aprilia RS457 चे विशेष फायदे सादर करत आहोत. सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन करतो आहोत.

Story img Loader