e wave x smaller than alto : छोटे वाहन लहान जागेत पार्क होऊ शकते, तसेच रस्त्यांवरील वाहतुकीतून देखील ते सहज पुढे निघते. या वैशिष्ट्यांमुळे लोक अशा कार्सना पसंत करतात. सध्या लहान कारविषयी विचार केला तर तुमच्या मनात मारुती आल्टो आलीच असेल. मात्र त्याहूनही छोटी कार एका जर्मन कार निर्मिती कंपनीने ग्राहकांसाठी सादर केली आहे. इ.गो या कंपनीने पॅरिस मोटर शोमध्ये आपली माइक्रो इलेक्ट्रिक कार इ व्हेव एक्स सादर केली आहे.

विशेष म्हणजे ही कार लांबीने मारुती आल्टो ८०० पेक्षाही छोटी आहे. आल्टोची लांबी ३.४४ मीटर आहे, तर ई व्हेव एक्सची लांबी ३.४१ मीटर इतकीच आहे. या कारला ३ दरवाजे असून ४ सीट आहेत. ही पूर्ण इलेक्ट्रिक कार असून तिच्यामध्ये ८६ किलोवॉटची बॅटरी देण्यात आली आहे. कार खूप क्युट दिसते. ती २४० किमीची रेंज देईल.

(महामार्गावर प्रवास करताना ‘हा’ क्रमांक लक्षात ठेवा, अपघातात आणि इतर संकटात मिळेल मदत)

असे आहे डिजाईन

डिजाइनच्या बाबतीत बोलायचे झाले तर कारचा समोरचा भाग पाहिल्यास मिनी कुपरची आठवण येते. कारला गोलाकार हेडलॅम्प देण्यात आले आहेत. तसेच, एलईडी डीआरएल, रॅली स्टाईल लाइट आणि सिल्वर बंपर मिळत आहे. कारमध्ये १८ इंचचे व्हिल्स मिळत आहेत.

कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल इन्फोटेनमेंट टचस्क्रिन देण्यात आले आहे. सेंट्रल कन्सोलमध्ये वायरलेस चार्जिंग पॅड देण्यात आले आहे. कारची इलेक्ट्रिक मोटर १०७ बीएचपीची शक्ती निर्माण करते. ही ४ सीटर कार असून तिच्यात रिअर व्हिल ड्राइव्ह फीचर आहे. डब्ल्यूएलटीपी अर्बन सायकलनुसार, ही कार फूल चार्जमध्ये २४० किमी चालू शकते. ११ किलोवॉट चार्जरने तिला चार्ज करता येऊ शकते. या कारची किंमत २० लाखांपासून सुरू होते.