Electric bikes Waiting for new year 2022 | वर्ष २०२२ मध्ये 'या' नव्या इलेक्ट्रिक बाइक्स वेटिंगमध्ये; सिंगल चार्जमध्ये २५० किमीपर्यंत अंतर कापणार | Loksatta

वर्ष २०२२ मध्ये ‘या’ नव्या इलेक्ट्रिक बाइक्स वेटिंगमध्ये; सिंगल चार्जमध्ये २५० किमीपर्यंत अंतर कापणार

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची गेल्या वर्षभरात मागणी वाढली आहे.

वर्ष २०२२ मध्ये ‘या’ नव्या इलेक्ट्रिक बाइक्स वेटिंगमध्ये; सिंगल चार्जमध्ये २५० किमीपर्यंत अंतर कापणार
वर्ष २०२२ मध्ये 'या' नव्या इलेक्ट्रिक बाइक्स वेटिंगमध्ये; सिंगल चार्जमध्ये २५० किमीपर्यंत अंतर कापणार

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची गेल्या वर्षभरात मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक वाहनं बाजारात आणली आहेत. त्यात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सर्वाधिक पसंत केल्या जातात. नवं वर्ष २०२२ मध्ये अशाच काही इलेक्ट्रिक बाइक्स नवीन फिचर्ससह बाजारात येणार आहेत. या बाइक्स एका चार्जवर १०० ते २५० किमीपर्यंत धावतील. यामध्ये तुम्हाला लिथियम आयन बॅटरीसह ड्रम आणि डिस्क ब्रेकची सुविधा मिळणार आहे. आगामी इलेक्ट्रिक बाइक्सबद्दल जाणून घेऊया.

  • Hero Electric AE-47: Hero इलेक्ट्रिक AE-47 ही हिरो ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. ही ८५ किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने धावेल. तसेच ४ हजार वॅट इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे. AE-47 मध्ये लाइटवेट पोर्टेबल लिथियम-आयन ४८V/३.५ kWh बॅटरी आहे. ही बॅटरी चार तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. AE-47 मध्ये दोन पॉवर मोड आहेत. पूर्ण चार्ज केल्यावर ८५ किमी ते १०० किमीपर्यंत अंतर कापण्याचा दावा करण्यात येत आहे. तथापि, इको मोडमध्ये, एका चार्जवर अंदाजे १६० किमी अंतर कापेल.
  • Ultraviolette F77: ही इलेक्ट्रिक बाइक २०२२ च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च केली जाणार आहे. बाइकची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 ही एक उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. मोटारसायकलला १४० किमी प्रतितास इतका वेग आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज १५० किमी असल्याचा दावा केला जात आहे. F77 रिमोट डायग्नोस्टिक्स, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, मल्टिपल राइड मोड्स, बाइक ट्रॅकिंग, राइड डायग्नोस्टिक्स आणि बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत.

कारचा रंग चांगला दिसावा यासाठी वॅक्स करावं की पॉलिश?, जाणून घ्या

  • Oki100: Oki100 इलेक्ट्रिक मोटरसायकल २०२२ च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल असून १००-१२० किमी प्रतितास वेगाने जास्तीत जास्त २०० किमीची रेंज देईल. या बाइकमध्ये काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी आणि वेगवान चार्जरच्या पर्याय आहे.
  • Komaki Electric: कोमाकी इलेक्ट्रिक व्हेहिकल जानेवारी २०२२ मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल लॉन्च करणार आहे. एका चार्जवर २५० किमीची रेंज असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कोमाकी रेंजरमध्ये ५००० W ची मोटर आहे. याशिवाय, कोमाकी रेंजरमध्ये क्रूझ कंट्रोल, रिपेअर स्विच, रिव्हर्स स्विच तसेच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.
  • Prevail Electric: ही गुरुग्राममधील नवीन इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी आहे. नवीन वर्षात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकलची कमाल रेंज ३५० किमी असल्याचा दावा केला जात आहे. नवीन हाय-परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल व्हेरियंटमध्ये येईल. पहिल्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला १२० KMPH चा टॉप स्पीड मिळेल, तर दुसऱ्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला १८० KMPH चा टॉप स्पीड मिळणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-12-2021 at 10:58 IST
Next Story
Petrol- Diesel Price Today: आजचे पेट्रोल- डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या इंधनाचे आजचा भाव