scorecardresearch

तुमची इलेक्ट्रिक कार जास्त रेंज देत नाही का? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा, वाहन पळेल सुसाट

जास्तीत जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या इलेक्ट्रिक कारचे रेंज कसे वाढविता येईल, यावर सोप्या टिप्स देणार आहोत.

Electric Car
इलेक्ट्रिक वाहनाची रेंज वाढवाण्यासाठी उपाय (Photo-financialexpress)

Electric Car Range Tips: देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicles) दबदबा वाढत चालला आहे. त्यामुळेच सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. इलेक्ट्रिक कार हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकांसमोर आहेत. भारतातही इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली आहे. मात्र, अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांची रेंज कमी असते, यामुळे चिंतेत आहेत. मात्र, चिंता करु नका तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनाची रेंज कशी वाढवता येईल, याबाबतची आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

इलेक्ट्रिक वाहनांची रेंज वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

  • आवश्यक नसल्यास बॅटरी जास्त चार्ज करू नका

तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार चार्ज करत असाल तर इलेक्ट्रिक कारची बॅटरी कधीही दहा टक्क्यांपेक्षा कमी होऊ देऊ नका. कारण दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाल्यास चार्ज व्हायला सर्वाधिक वेळ लागतो. अशा स्थितीत बॅटरी वीस टक्क्यांच्या आसपास असेल तेव्हाच ती चार्ज करण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळी, आवश्यक नसल्यास बॅटरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका.

(हे ही वाचा : आता पार्किंगचे नो टेन्शन! मार्केटमध्ये येतेयं फोल्ड होणारी इलेक्ट्रिक कार; रेंज, डिझाईन अन् फीचर्स पाहून व्हाल दंग )

  • इलेक्ट्रिक कारमध्ये जास्त सामान नेऊन प्रवास करणे टाळा

तुमच्या कारवर अधिक लोड होऊ नये याची दक्षता घ्या. कारण अशावेळेस बॅटरीचा वापर वाढतो. तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार ओव्हरलोड करणे टाळावे. कारण यामुळे वजन वाढून बॅटरीचा वापर वाढतो. तसेच प्रवासावेळी जास्त सामानदेखील नेऊ नये. आवश्यक असलेलेच साहित्य सोबच घ्यावे.

  • इलेक्ट्रिक कार मेन्टेन करा

महिन्यातून एकदा ही ईव्ही कार मेकॅनिक किंवा सर्व्हिस सेंटवर नेणं गरजेचं आहे. तसं केल्यास कारची बॅटरी खूप टिकते. इलेक्ट्रिक कार मेन्टेन करणं शिका.

  • घरीच चार्जिंग करणे चांगले

इलेक्ट्रिक वाहन मालकांनी त्यांच्या घरीच गाडी चार्ज करण्याची सुविधा बनवली तर त्यांच्यासाठी उत्तम असेल. जेणेकरून तुमचं वाहन चार्ज करण्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे भटकावं लागणार नाही.घरामध्ये सोलर पॅनल्स लावा, इलेक्ट्रिक कारचे चार्जिंग सॉकेट त्याला कनेक्ट करा, हे पॅनल्स बसवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

(हे ही वाचा : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करताय? अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली मोठी तरतूद; जाणून घ्या )

  • सूर्यप्रकाशात चार्ज करु नका

इलेक्ट्रिक वाहन नेहमी गॅरेजमध्ये पार्क करणे चांगले असते. उन्हातही गाडी चार्ज करू नका. इलेक्ट्रिक कारसाठी उच्च तापमान हे धोकादायक ठरतं. कारण तापमान जास्त असते तेव्हा इलेक्ट्रिक कारची रेंजही कमी होत असते. तसेच महत्त्वाचे म्हणजे सूर्यप्रकाशात इलेक्ट्रिक वाहन चार्ज केल्याने बॅटरीचेही नुकसान होते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 11:20 IST