scorecardresearch

Car Loan: कार चोरीला गेली तरी EMI भरावे लागणार का? जाणून घ्या काय सांगतो नियम

Car Loan: कार चोरीला गेल्यास EMI भरावे लागेल का, जाणून घ्या…

Car Loan
कार चोरीला गेली तरी लोन भराव लागणार? (Photo-freepik)

What Happens to Car Loan if its Stolen: देशात सध्या वाहनांची विक्री खूप होत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनासाठी सोप्या पद्धतीने मिळणारे वाहन कर्ज. भारतात विकणाऱ्या कारमध्ये जास्तीत जास्त या कार लोनवर घेतल्या जातात. परंतु भारतात कार चोरीच्या घटना सर्रास घडतात. मात्र, अशा घटनेमुळे कोणत्याही व्यक्तीचे लाखो रुपयांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत एक प्रश्न असाही निर्माण होतो की, कर्जावर खरेदी केलेली अशी कार चोरीला गेली तर चोरी झाल्यानंतरही तुम्हाला तिच्या कर्जाचा ईएमआय भरावा लागेल का? चला तर जाणून घेऊया सविस्तर …

कार चोरीला गेली तरी EMI भरावा लागणार?

तुमची कार चोरीला गेली असली तरी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलेली रक्कम तुम्हाला नक्कीच परत करावी लागेल. पण जर तुम्ही एका छोट्या गोष्टीची काळजी घेतली तर कार चोरी झाल्यास तुम्हाला बँकेत रक्कम परत करावी लागणार नाही. कारण, अशा परिस्थितीत विमा दावा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

(हे ही वाचा : Car Insurance घेताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, अन्यथा कंपनी.. )

कार विमा करेल मदत

जर तुमची कार चोरीला गेली असेल ज्याचा तुम्ही विमा (car insurance) घेतला असेल तर तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता. तुमच्याकडे कार विमा असताना तुमची कार चोरीला गेल्यास, विमा कंपनी नुकसान भरपाई देईल. त्यानंतर तुम्ही या पेमेंटमधून कार लोन पेमेंट करू शकता. तुमची विमा पॉलिसी चोरीचे दावे कव्हर करते, तर तुम्ही कार चोरीसाठी दावा करू शकता. या प्रकरणात, विमा कंपनी तुमच्या कारच्या IDV (Insured Declared Value) च्या आधारे कर्ज भरेल. कर्जाची परतफेड करूनही हक्काचे पैसे शिल्लक राहिल्यास ते तुम्हाला मिळेल. तथापि, ही एक लांब प्रक्रिया आहे. यास काही महिने देखील लागू शकतात.

कार विमा नसेल तर काय होईल?

जर तुम्ही कारचा विमा काढला नसेल आणि ती चोरीला गेली तर तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला कार परत मिळणार नाही आणि तुम्हाला EMI देखील भरावा लागेल. म्हणूनच तुमच्या कारचा विमा कालबाह्य होण्यापूर्वी त्याचे नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:13 IST

संबंधित बातम्या