Doodle V2 foldable e bike : अलिकडे तंत्रज्ञान क्षेत्रात फोल्डेबल तंत्रज्ञानाची मोठी चर्चा आहे. आयफोन निर्माती कंपनी अ‍ॅपल सॅमसंगप्रमाणे आपला फोल्डेबल फोन कधी लाँच करणार? याबाबत चर्चा रंगली असताना ऑटो सेक्टरमध्येही आता एक फोल्डेबल वाहन उपलब्ध झाले आहे. ईमोटोरॅड या कंपनीने doodle v2 ही फोल्डेबल ई बाईक लाँच केली आहे. या ई बाईकची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक

डुडल व्ही २ शहरात चालवण्यासाठी, तसेच वाळू असलेल्या प्रदेशांमध्येही साहसी क्रियाकलाप करण्यासाठी योग्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नव्या डुडल व्ही २ मध्ये पुढच्या भागात बकेट लावण्यासाठी ४ बोल्ट आणि कॅरिअरवर बास्केट जोडण्यासाठी ४ बोल्ट देण्यात आले आहेत. ही ई बाईक बटरफ्लाय हँडल आणि बॅटरीवर चालणाऱ्या टेल लाइटने सूसज्ज आहे.

(पेट्रोल कार सीएनजीमध्ये बदलायची आहे? मग ‘हे’ करा)

फोल्डेबल बाईकमध्ये ३६ वोल्ट २५० वॉट रिअर हब मोटरसह ३६ वोल्ट १०.४ अ‍ॅम्पिअर हवरची बाईकमधून काढता येणारी बॅटरी मिळते. त्याचबरोबर, शिमानो ७ स्पिड शिफ्टर, ९० एमएम ट्रावेलसह फ्रंट फोर्क, ऑटो कट ऑफ आणि इ ब्रेकसह मेकॅनिकल डिस्क ब्रेक, अ‍ॅल्युमिनिय अलॉय ३६ एच डबल वॉल रिम्स आणि मोठे २०x४ नायलॉन टायर्स मिळतात. बईकमध्ये हॉर्नसह फ्रंट लाईट आणि वॉटरफ्रुफ कव्हरसह एम ५ एलसीडी मिळतो.

बाईकमध्ये काही सुधारीत वैशिष्ट्ये मिळतात. यामध्ये डेडिकेटेड हेडलाईट आणि हॉर्न मॉड्युल, स्टर्डी कॅरिअर, सुधारीत पेडल असिस्ट मोड आणि बाईकला पुढे आणि मागे सुधारीत मडगार्ड देण्यात आले आहेत. ही ई बाईक तुम्ही ईमोटोरॅडच्या अधिकृत वेबसाईटसह अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा आणि ऑफलाईन डिलरशीपकडून खरेदी करू शकता. बाईक ५५ किमी पर्यंतची रेंज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.