Bike Driving Tips : आपल्यापैकी अनेक जण स्वत:च्या दुचाकीने दररोज प्रवास करतात. दुचाकी चालवताना सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दुचाकी चालवताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही नियमानुसार नीट गाडी चालवली नाही तर तुम्ही स्वत:बरोबर इतरांना सुद्धा अडचणीत टाकू शकता. आज आपण अशा काही खास टिप्स जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक दुचाकी चालकाने लक्षात ठेवायला पाहिजे. (every biker follow these habits for safety while driving bike)

वेगाने दुचाकी चालवू नका (Slow Driving)

अनेकदा तरुण मंडळी अतिशय वेगाने दुचाकी चालवतात. जितक्या वेगाने तुम्ही दुचाकी चालवाल, तितकीच अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दुचाकी हळू चालवा.

the biker hit the bicycle
सांगा, चूक कोणाची? बेशिस्त दुचाकीस्वाराने आधी धडक दिली, मग सायकल फरफटत नेली; सायकलस्वाराने ‘अशी’ घडवली अद्दल! Video Viral
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
daily habits, cardiovascular health
हृदयासंबंधित आजार उद्भवू नयेत यासाठी तज्ज्ञांनी सांगितले दैनंदिन दिनचर्येतील सहा महत्त्वाचे बदल; घ्या जाणून…
Phodni Tadka tempering
फोडणी देताना नेहमी जिरे-मोहरी करपते का? कडीपत्ता काळा होतो? नेमकं चुकतंय कुठं? जाणून घ्या फोडणी देण्याच्या सोप्या टिप्स
Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
Accident
Accident : बाईकवर स्टंट करणाऱ्याला वाचवताना घात झाला, कारची ५ वेळा पलटी; कुंभमेळ्यावरून परतणारे ५ नेपाळी भाविक ठार

विशिष्ट अंतर ठेवून दुचाकी चालवा (Keep distance While Driving)

जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर समोरून येणार्‍या वाहनापासून विशिष्ट अंतर ठेवा. बहुतेक अपघात समोरून येणाऱ्या वाहनांपासून कमी अंतर ठेवून दुचाकी चालत असल्याने घडतात. समोरून येणार्‍या गाडीपासून कमीत कमी ७० मीटर अंतरावर दुचाकी चालवा.

साइड मिररचा वापर करा (Use Side Mirror)

दुचाकी सुरू करण्यापूर्वी साइड मिरर तपासा आणि मागून येणाऱ्या गाड्या नीट दिसतात की नाही, हे तपासा आणि त्यानुसार मिररला सेट करा. दुचाकी चालवताना मिररचा वापर तुम्हाला अनेकदा अपघातापासून वाचवू शकतो.

दुचाकी चालवताना रस्त्यावर फक्त लक्ष केंद्रित करा (Focus on a Road)

दुचाकी चालवताना आपले लक्ष नेहमी रस्त्यावर असायला पाहिजे. ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर करू नये. मेसेज सुद्धा टाइप करू नये. दुचाकी चालवताना इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये. चालकाचे संपूर्ण लक्ष दुचाकी चालवण्यावर असायला पाहिजे कारण रस्त्यावर अचानक खड्डा आला किंवा ब्रेकर आला तर तुमचे गाडीवरचे नियंत्रण सुटू शकते.

मद्यपान करून ड्रायव्हिंग करू नये (Do not drive if you are Drunk)

मद्यपान करून ड्रायव्हिंग करू नये. मद्यपान करून गाडी चालवणे म्हणजे नियम मोडणे होय. याशिवाय असे केल्याने स्वत:बरोबर तुम्ही इतरांचा जीव सुद्धा धोक्यात टाकता.

Story img Loader