scorecardresearch

१ एप्रिलपासून कार खरेदी करणं पडेल महागात, कोणत्या गाड्यांचे भाव वाढणार? जाणून घ्या

जर तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या दोन दिवसात गाडी बूक करा. अन्यथा गाडी खरेदी करणं महागात पडणार आहे.

BMW-3-Series
१ एप्रिलपासून कार खरेदी करणं पडेल महागात, कोणत्या गाड्यांचे भाव वाढणार? जाणून घ्या (Photo-BMW)

जर तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या दोन दिवसात गाडी बूक करा. अन्यथा गाडी खरेदी करणं महागात पडणार आहे. २०२२-२३ आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी काही कंपन्यांनी १ एप्रिलपासून गाड्यांचे भाव वाढवण्याबाबत घोषणा केली आहे. कार उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. कार निर्माता टोयोटा किर्लोस्कर मोटर, टाटा मोटर्स, बीएमडब्ल्यू इंडिया आणि मर्सिडीज-बेंझसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. लक्झरी ऑटोमेकर व्होल्वो कार इंडिया वाढत्या उत्पादन खर्चामुळे आपल्या मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. व्हॉल्वो कार इंडिया सध्या S60 आणि S90 सारख्या सेडान आणि XC40, XC60 आणि XC90 सारख्या SUV विकते.

टाटा मोटर्स
टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती २ ते २.५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाची ऑटो कंपनी टाटा मोटर्स १ एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेआहे. व्यावसायिक वाहनांमध्ये २ ते २.५ टक्के वाढ होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

बीएमडब्ल्यू इंडिया
महागडी लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू इंडियाने आपल्या सर्व कारच्या किमती वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. १ एप्रिलपासून कारच्या किमतीत ३.५ टक्क्यांनी वाढ होईल. कच्चा आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ झाल्यामुळे किंमत वाढवावी लागत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

Tesla: टेस्लाने ग्राहकांकडून इलेक्ट्रिक कार परत मागवल्या, कारण…

टोयोटा किर्लोस्कर
१ एप्रिलपासून टोयोटाने सर्व मॉडेल्सच्या किमतीत ४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टोयोटाने सांगितले की, कच्चा मालाच्या किमतीत वाढ झाल्याने भाव वाढ करणे आवश्यक आहे. ग्लान्झा व्यतिरिक्त, टोयोटा किर्लोस्कर भारतात फॉर्च्युनर, इनोव्हा क्रिस्टा, कॅमरी, वेलफायर आणि अर्बन क्रूझरसह सहा मॉडेल्स विकते.

मर्सिडीज बेंझ
मर्सिडीज-बेंझ इंडियाने १ एप्रिलपासून त्यांच्या सर्व मॉडेल सीरिजसाठी ३ टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. १ एप्रिलनंतर कंपनीच्या गाड्या ५० हजार ते पाच लाख रुपयांनी महागणार आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Expensive to buy a car from april 1 2022 know about it rmt