बनावट FASTag ची होतेय ऑनलाइन विक्री; जाणून घ्या कशी टाळता येईल फसवणूक

बनावट फास्टॅग ऑनलाइन विकण्यास झाली आहे. फसवणूक करणारे NHAI किंवा IHMCL सारखे बनावट FASTag विकत आहेत जे खरे दिसत असले तरी ते बनावट आहेत.

fastag-all-vehicles
बनावट फास्टॅग ऑनलाइन विकण्यास सुरुवात (फोटो: Indian Express )

आधुनिक टोल नियमांना गती देण्यासाठी फास्टॅगची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे लोकांना ट्राफिक आणि इतर समस्यांपासून दिलासा मिळाला होता. मात्र आता याबाबत काही फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. या संदर्भात NHI ने देखील इशारा दिला आहे की फास्टॅग खरेदी करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकतात. अधिक माहिती देताना NHAI ने म्हटले आहे की, काही फसवणूक करणाऱ्यांनी बनावट फास्टॅग ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली. फसवणूक करणारे NHAI किंवा IHMCL सारखे बनावट फास्टॅग विकत आहेत जे खरे दिसत असले तरी ते बनावट आहेत. तुम्ही फसवणूक कशी टाळू शकता ते जाणून घ्या.

FASTag योग्य ठिकाणाहून खरेदी करा

बनावट फास्टॅग बाजारात विकले जात असताना खरा फास्टॅग कुठून आणायचा हा मोठा प्रश्न आहे. या संदर्भात NHAI ने कळवले आहे की मूळ फास्टॅग खरेदी करण्यासाठी तुम्ही https://ihmcl.co.in/ या वेबसाइटला भेट द्यावी किंवा तुम्ही MyFastag अॅपवरून ते मिळवू शकता. किंवा तुम्ही सूचीबद्ध बँका आणि विक्री एजंट्सच्या अधिकृत विक्री केंद्रावरून फास्टॅग देखील खरेदी करू शकता.

( हे ही वाचा: TVS Raider vs Honda SP 125: कमी किंमत असलेली आणि स्टायलिश बाइक कोणती? जाणून घ्या )

तुम्ही येथून देखील मिळवू शकता फास्टॅग

फास्टॅग पटकन मिळवण्यासाठी, तुम्ही Amazon.in ला देखील भेट देऊ शकता किंवा ICICI बँक, HDFC बँक, एअरटेल पेमेंट्स बँक, SBI, कोटक बँक, अॅक्सिस बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँक यासारख्या बँकांशी संपर्क साधू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसा करायचा?

तुमचे फास्टॅग खाते रिचार्ज करण्यासाठी, तुम्ही बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा NEFT किंवा RTGS किंवा नेट बँकिंग वापरून ऑनलाइन पेमेंट करू शकता. फास्टॅग खात्यावर एक लाख रुपयांपर्यंतचा रिचार्ज करता येतो. याशिवाय, तुम्ही Google Pay, Paytm, Airtel Payments Bank आणि PhonePe द्वारे तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन पेमेंट करू शकता.

( हे ही वाचा: ‘या’ राशीच्या मुली मानल्या जातात अतिशय कुशाग्र बुद्धीच्या; त्यांना करिअरमध्येही लवकर मिळते यश )

येथे तक्रार करा

फास्टॅगशी संबंधित माहिती IHMCL च्या वेबसाइटवर देखील दिली आहे. अशा परिस्थितीत, तुमची कोणतीही तक्रार असल्यास, तुम्ही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या १०३३ क्रमांकावर कॉल करून बनावट फास्टॅग बद्दल तक्रार करू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fake fastag is being sold online learn how to avoid fraud ttg

ताज्या बातम्या