इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटरवर प्रथमच मोठी सूट देत आहे. कंपनीने जाहीर केले आहे की सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी, विक्री वाढवण्यासाठी एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर सूट देण्यात येणार आहे. ओला एस१ प्रो स्कूटर सुरूवातीला १.४० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली होती. आता कंपनी त्यावर १०,००० रुपयांची सूट देत आहे. सणांच्या दिवसांसाठी असणारी या ऑफरवरील बुकिंग्स आधीच सुरू झाले आहेत.

ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे सणांच्या दिवसातील या स्पेशल ऑफरची घोषणा केली. ‘ओलाच्या सणांच्या ऑफरचा पुरेपूर फायदा घ्या आणि ‘ओला एस१ प्रो’वर १०,००० रुपयांची सूट मिळवून सण आनंदात साजरा करा. इतर फायनान्स पर्यायदेखील तुमची वाट पाहत आहेत’, असे कॅप्शन ओलाने दिले आहे. ही ऑफर ५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत उपलब्ध आहे.

Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा

आणखी वाचा : ‘या’ आहेत सुझुकीच्या लोकप्रिय बाईक्स व स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स

असे करा बुकिंग

  • ओला इलेक्ट्रिकच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ओलाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
  • त्यानंतर फेस्टिव्ह ऑफर्स टॅबवर क्लिक करा.
  • सवलतीच्या दरात एस१ प्रो खरेदी करण्याचा पर्याय निवडा, ज्याची किंमत १.५० लाख रूपये (एक्स-शोरूम) आहे. त्यानंतरची बुकिंगची प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे.

फीचर्स

  • ओला एस१ प्रो पूर्ण चार्जवर १८० किमी पेक्षा जास्त एआरएआय प्रमाणित श्रेणीसह प्रवास करू शकते.
  • इलेक्ट्रिक स्कूटरची वास्तविक रेंज सुमारे १७० किमी असल्याचा दावा केला जातो.
  • ‘एस१ प्रो’चा टॉप स्पीड ११६ kmph आहे आणि फक्त तीन सेकंदात ० ते ४० kmph पर्यंत स्पीड वाढवू शकते.
  • ओला एस१ प्रो ४kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक उपलब्ध आहे. जे पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे ६ तास ३० मिनिटे घेते.
  • भारतीय मार्केटमध्ये ही स्कूटर ‘अथर एनर्जी’च्या ‘४५०एक्स जेन ३’ या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करू शकते.