FIFA World Cup 2022 Messi Football Club Argentina Defeat Saudi Arabia Players Get 10 crore Rolls Royce Phantom | Loksatta

FIFA World Cup 2022: मेस्सीच्या अर्जेंटिनाला हरवणाऱ्या ‘या’ फुटबॉलपटुंना १० कोटीची कार बक्षीस; फीचर्स ऐकाल तर..

FIFA World Cup 2022: सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीच्या खेळाडूंना चक्क १० कोटींची आलिशान गाडी गिफ्ट म्हणून दिल्याचे समजत आहे.

FIFA World Cup 2022 Messi Football Club Argentina Defeat Saudi Arabia Players Get 10 crore Rolls Royce Phantom
Rolls Royce ची किमत तब्बल १० कोटी रुपये इतकी आहे. या गाडीचे फीचर्स ऐकून तुम्हीही थक्क व्हाल (फोटो: ट्विटर/ RollsRoyce)

FIFA World Cup 2022: कतार येथे सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेटिनाच्या संघाला आशियाई संघ सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. मध्यंतराच्या एका गोलच्या पिछाडीनंतरही उत्तरार्धात सालेह अलशेरी आणि सालेम अलडावसारी यांनी पाच मिनिटांच्या अंतराने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर सौदी अरेबियाने त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वांत मोठा विजय साकारला. हा विजय सौदी अरेबियासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. या अनपेक्षित विजयानंतर सौदीमध्ये एक दिवसाचिया राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती, तसेच आता सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीच्या खेळाडूंना चक्क १० कोटींची आलिशान गाडी गिफ्ट म्हणून दिल्याचे समजत आहे.

प्राप्त माहितीनुसार सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी फ़ुटबॉल संघातील सर्व खेळाडूंसाठी रॉल्स रॉयस फँटम देण्याची घोषणा केली आहे. या गाडीची किमत तब्बल १० कोटी रुपये इतकी आहे. या गाडीचे फीचर्स ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, चला तर पाहुयात…

रॉल्स रॉयसचे फीचर्स (Rolls Royce Features)

सध्या भारतात रॉल्स रॉयस फँटम कारची किंमत ८ कोटी ९९ लाखांपासून सुरु होते तर १०. ४८ कोटींपर्यंत या गाडीच्या किमतीची रेंज आहे. या गाडीत केवळ पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. ६. ७५ लिटरच्या पेट्रोल इंजिनसह गाडीत दोन पॉवर ट्युनिंग उपलब्ध आहेत. या इंजिनची क्षमता पाहिल्यास इंजिन तब्बल ५३५० आरपीएम, ४५३ बीएचपीच्या क्षमेतसह येते तर दुसरे इंजिन ३५००, आरपीएम ७५० बीएचपी, ९०० एनएम टॉर्क जनरेटसह उपलब्ध आहे.

रॉल्स रॉयस फँटमचे वैशिष्ट्य असे की ही गाडी अवघ्या ५, ४ सेकेंडत शून्यावरून १०० किमी स्पीड पडकू शकते. रॉल्स रॉयस मध्ये ८ गिअर देण्यात आले आहेत, ज्यात सॅटेलाईट ट्रान्समिशनच्या मदतीने उत्तम नियंत्रण ठेवणे शक्य होते. सुरक्षेच्या दृष्टीनेही या रॉल्स रॉयसला १०० टक्के गुण दिले जाऊ शकतात. कमी उजेडात सुद्धा या गाडीचे हेडलाईट्स ६०० मीटर पर्यंतचे दृश्य स्पष्ट दाखवतात.

हे ही वाचा << 70 हजारात दारात उभी राहील नवीकोरी Honda Amaze कार; तुम्हीही घेऊ शकता या ऑफरचा लाभ

दरम्यान, १० कोटीच्या गाडीचे गिफ्ट व राष्ट्रीय सुट्टी यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की सौदी अरेबियासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता. अर्जेंटिना मागील ३६ सामन्यात विजय प्राप्त केला होता मात्र २२ ऑक्टोबरला मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबियाकडून पराभूत झाला. जागतिक आकडेवारीत ५१ व्या स्थानी असणाऱ्या सौदी अरेबियाने या विजयासह विश्वचषकातील आपले आव्हान मजबूत केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 11:49 IST
Next Story
३ नवीन रंगांमध्ये सादर झाली ROYAL ENFIELD HIMALAYAN; यूएसबी पोर्टही दिले, पाहा फोटो