ऑल न्यू रॉयल एनफील्ड हंटर ३५०, ७ ऑगस्ट २०२२ रोजी भारतात लॉंच होईल. यामधील अनेक गोष्टी नवीन जनरेशनच्या क्लासिक ३५० आणि मिटीऑर ३५० सारख्याच आहेत. कंपनीने या नवीन ३५० सीसी रेट्रो मोटरसायकलचे फीचर्स, मायलेज आणि इतर डिटेल्स देखील उघड केले आहेत. या बाईकच्या इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि मायलेजबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयल एनफील्ड हंटर ३५० चे इंजिनचे स्पेसिफिकेशन्स आणि माइलेज

नवीन २०२२ रॉयल एनफील्ड हंटर ३५० मध्ये ३४९सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड, इंधन-इंजेक्‍ट इंजिन आहे जे ६,१०० आरपीएम वर २०.२ बीएचपी पॉवर आणि ४,००० आरपीएम वर २७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की ते ३६.२ केएमपीएल मायलेज देण्यास सक्षम आहे.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० फीचर्स

रॉयल एनफील्ड हंटर ३५० मध्ये ४१ एमएम टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ६-स्टेप अडजस्टेबल ट्विन शॉक एब्जॉर्बस आहेत. मोटरसायकलला १७ इंची चाके आहेत. यात स्पोक व्हील आणि अलॉय व्हीलचा पर्याय मिळेल, जो व्हेरिएंटवर अवलंबून असेल. ब्रेक्सबद्दल बोलायचे झाले तर समोर ३००एमएम डिस्क आणि मागील बाजूस ड्युअल-चॅनल एबीएस सह २७० एमएम डिस्क असेल.

Traffic Rules : बाईक चालवताना स्लीपर घातल्यास भरावा लागेल दंड; वाहतुकीचे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का?

रॉयल एनफील्ड हंटर ३५० ची लाँच डेट आणि किंमत

नवीन २०२२ रॉयल एनफील्ड हंटर ३५० रेट्रो आणि मेट्रो या दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाईल. ७ ऑगस्ट रोजी त्याच्या किमती अधिकृतपणे जाहीर केल्या जातील. ही देशातील सर्वात स्वस्त रॉयल एनफिल्ड मोटरसायकल असेल अशी अपेक्षा आहे. नवीन रॉयल एनफील्ड हंटर ३५० ची स्पर्धा टीव्हीएस रोनीन, जावा ४२ आणि होन्डा हायनेस सीबी ३५० अशा अनेक बाईकशी आहे.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० कोणी घेऊ नये?

रॉयल एनफील्डने दावा केला आहे की हंटर ३५० चे मायलेज ३६.२ केएमपीएल पर्यंत आहे. पेट्रोलची किंमत आता १०० रुपयांच्या जवळपास आहे, त्यामुळे ही बाईक जवळपास ३ रुपये प्रति किलोमीटर दराने धावेल. म्हणूनच ज्यांना जास्त मायलेज देणारी आणि चालवायला कमी खर्च येणारी बाईक घ्यायची आहे, अशा लोकांनी ही बाईक घेऊ नये.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally the wait is over royal enfield hunter 350 to be launched in just a few hours know the estimated cost pvp
First published on: 06-08-2022 at 17:25 IST