तरुणांमध्ये आकर्षक आणि मायलेज देणाऱ्या स्पोर्ट्स बाइकची क्रेझ आहे. नवनव्या स्पोर्ट्स बाइकबाबत मित्रांमध्ये चर्चा होत असते. मग शेवटी कुठे जाऊन खात्री झाली की बाइक घेण्यासाठी पुढाकार घेतला जातो. जर तुम्हाला स्पोर्ट्स बाइक्सची आवड असेल आणि कमी बजेटमध्ये चांगली आणि वेगवान बाइक घ्यायची असेल, तर देशातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती देणार आहोत. TVS Apache RTR 160 4V आणि Suzuki Gixxer या दोन बाइकची किंमत ते स्पेसिफिकेशनपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

TVS Apache RTR 160 4V: टीव्हीएस कंपनीची एक लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक आहे. कमी किमतीत प्रीमियम स्टाइलिंगसाठी पसंत केली जाते. कंपनीने चार प्रकारांसह गाडी बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर यामध्ये १५९.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १७.६३ पीएसची पॉवर आणि १४.७३ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये सिंगल चॅनल एबीएस सिस्टमसह डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, गाडी ५० किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. हा मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. TVS Apache RTR 160 4V ची सुरुवातीची किंमत १.१५ लाख रुपयांपासून सुरू होते जी त्याच्या टॉप व्हेरियंटवर १.२१ लाखांपर्यंत जाते.

तुम्हाला नविन गाडी घ्यायची आहे का?, मग ही बातमी वाचा आणि मग ठरवा

Suzuki Gixxer: सुझुकीची एक वेगवान आणि आकर्षक डिझाइन केलेली स्पोर्ट्स बाईक आहे. कंपनीने एकाच प्रकारासह बाजारात आणली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने १५५ सीसी सिंगल सिलेंडर दिले आहे जे एअर-कूल्ड फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. इंजिन १३.६ पीएस पॉवर आणि १३.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलं आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने बाईकच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक्स दिले असून सिंगल चॅनल एबीएस सिस्टमसह येते. बाईकच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की, Suzuki Gixxer ६४ किमीचा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. Suzuki Gixxer ची सुरुवातीची किंमत १.२१ लाख रुपये आहे.