नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील डी-२०७ येथील बीएमडब्ल्यू वर्कशॉपला भीषण आग लागली. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत लाखो रुपये किंमतीच्या ४० ते ४५ बीएमडब्ल्यू गाड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसीसह कोपरखैरणे, नेरुळ आणि शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी सुमारे सहा तासांचा अवधी लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आग आटोक्यात येईपर्यंत बरंच नुकसान झालं होतं. वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रं जळून खाक झाली आहेत. आगीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुर्भे पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून जागेचा पंचनामा करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire workshop at turbhe midc burn 40 45 bmw cars rmt
First published on: 08-12-2021 at 10:51 IST