Best Selling 7 Seater Car: भारतीय कार बाजारात SUV वाहनांसोबतच सात सीटर कारची मागणीही झपाट्याने वाढली आहे. सध्या बाजारात अनेक ७ सीटर एमपीव्ही आणि ७ सीटर एसयूव्ही वाहने आहेत. मारुती सुझुकी एर्टिगाला आतापर्यंत सर्वाधिक विकल्या जाणार्या सात सीटर कारचा खिताब मिळाला होता, परंतु २०२३ च्या पहिल्या ६ महिन्यांत आणखी एका सात सीटर कारने केवळ एर्टिगाच नाही तर विक्रीच्या बाबतीत इनोव्हालाही मागे टाकले आहे. 'या' कारनं मारली बाजी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) महिंद्रा बोलेरोने ७-सीटर विक्री चार्टमध्ये अव्वल स्थान पटकावले. यावर्षी ६ महिन्यांत ५३,८१२ मोटारींची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५,९९४ युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे बोलेरोच्या विक्रीत १७ टक्क्यांनी सकारात्मक वाढ झाली आहे. महिंद्रा बोलेरोला आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत ते आवडते. (हे ही वाचा: ‘या’ भारतातील सर्वात स्वस्त सात सीटर MPV कारसमोर बाकी सर्व पडतात फिक्या; किंमत फक्त… ) बोलेरोची वैशिष्ट्ये महिंद्रा बोलेरो दोन मॉडेल्समध्ये येते - बोलेरो आणि बोलेरो निओ. महिंद्रा बोलेरोची किंमत ९.७८ लाख रुपयांपासून सुरू होते, तर बोलेरो निओची किंमत ९.६३ लाख रुपयांपासून सुरू होते. बोलेरोला १.५-लिटर डिझेल इंजिन (७५PS/२१०Nm) मिळते, जे पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. बोलेरो डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल एसी, एयूएक्स आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी, पॉवर विंडो आणि पॉवर स्टीयरिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसह येते. गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक विकल्या गेलेल्या ७ सीटर कार महिंद्रा बोलेरो - ५३,८१२ युनिट्समहिंद्रा स्कॉर्पिओ - ५२,०३६ युनिट्समारुती सुझुकी एर्टिगा - ४९,७३२ युनिट्सकिआ कार - ४०,७७१ युनिट्सटोयोटा इनोव्हा - ३८,६४७ युनिट्स