scorecardresearch

7-सीटर SUV-MPV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ पाच दमदार कार, लूक अन् डिझाईनही कमाल

तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एखादी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येणाऱ्या नव्या वर्षात लाँच होणाऱ्या गाड्यांबद्दल तुम्हाला येथे माहिती मिळणार आहे.

7-seater Car
7-सीटर SUV-MPV कार.(Photo-jansatta)

Upcoming 7 Seater Car Launch In 2023: मोठ्या फॅमिलीसाठी एखादी चांगली 7-सीटर कार खरेदी करायच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. थोडे दिवस थांबल्यास मार्केटमध्ये 7-सीटर कारसाठी काही शानदार पर्याय उपलब्ध होणार आहेत. सतत लांबच्या प्रवासासाठी जाणारे किंवा मोठ्या फॅमिलीसाठी 7-सीटर आकाराच्या एसयूव्ही, एमपीव्हीला खरेदीला प्राधान्य दिले जाते. आज आम्ही तुम्हाला २०२३ मध्ये बाजारपेठेत येणाऱ्या ५ शानदार पूर्ण आकाराच्या एसयूव्ही, एमपीव्ही गाड्यांबाबत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या कार.

‘या’ पाच दमदार 7-सीटर लाँच होणार

​MG Hector Plus Facelift
एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनी देखील त्यांची लोकप्रिय एसयूव्ही ​MG Hector Plus Facelift अपडेट करून नव्या अवतारात बाजारात नवीन वर्षांत लाँच करणार आहे. यात डॅशबोर्ड, सेंट्रल कन्सोल आणि स्टीयरिंग व्हील सर्व-नवीन असतील. SUV मध्ये नेक्स्ट-जेन i-Smart तंत्रज्ञान आणि वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह नवीन १४-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ज्यात खूप सारे नवीन फीचर्स, जबरदस्त इंटिरियर आणि खूप काही खास दिसणार आहे. एमजी हेक्टर प्लस फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत १६ ते १८ लाख रुपये दरम्यान असू शकते.

(हे ही वाचा : Car Finance Plan: फक्त ५२ हजारात घरी घेऊन जा टाटाची जबरदस्त मायलेजवाली ‘ही’ कार; एवढा बसेल EMI )

Toyota Innova Hycross
टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात नवी इनोवा हायक्रॉस सादर केली आहे. सध्या बाजारात असलेल्या मॉडेलच्या तुलनेत नव्या इनोवा हायक्रॉसमध्ये बरेच बदल केले आहेत. यात नव्या मोनोकॉक इंजिनसह हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. जानेवारी २०२३ मध्ये या कारची डिलिव्हरी दिली जाणार आहे. नवी एमपीव्ही दोन पेट्रोल आणि 3 हायब्रिड व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. नव्या इनोवा हायक्रॉस कारमध्ये दमदार हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे.

Tata Safari Facelift
टाटा सफारीची अपडेटेड व्हर्जन पुढील वर्षी स्थानिक पातळीवर पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये ADAS सह कॉस्मेटिक अपडेट्स आणि इंटीरियर फीचर अॅडिशन्सचा समावेश असेल. त्याचे २.०-लिटर टर्बो डिझेल इंजिन सुमारे १७० पीएस कमाल पॉवर आणि ३५० एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी राखून ठेवता येते.

(हे ही वाचा : स्वस्त आणि दमदार ७ सीटर SUV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ तीन दमदार SUV )

​2023 Mahindra Bolero Neo Plus
भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा लवकरच त्यांच्या लोकप्रिय मिड साईज एसयूव्ही बोलेरो निओचं नवीन व्हर्जन बोलेरो निओ प्लस लाँच करणार आहे. हे बोलेरो निओचं अपडेटेड व्हर्जन असेल. ही कार TUV300 सारखी असेल. तसेच ही कार महिंद्रा थारच्या इंजिनसह लाँच केली जाईल. म्हणजेच या कारमध्ये २.२ लीटर mHawk डिझेल इंजिन दिलं जाऊ शकतं. ज्याची किंमत १० लाख ते १२ लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.

5 Door Force Gurkha
थारला देशात फोर्स मोटरची गुरखा तगडे आव्हान देत आहे. सध्या फोर्स मोटरकडे ३ डोअर गुरखा हे वाहन आहे जे थेट महिंद्रा थारला टक्कर देते. मात्र, आता कंपनी फोर्स गुरखाचे ५ डोअर व्हर्जन लाँच करणार आहे यात २.६ लीटर डिझेल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे ९० एचपी पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ४ व्हील ड्राइव्हचा पर्याय देखील असू शकतो.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 19:57 IST