Electric Scooters: सध्या जमाना इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. इलेक्ट्रिक कारबरोबरच इलेक्ट्रिक स्कूटर देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणीदेखील वाढते आहे. दुचाकी क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी वर्ष २०२२ मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरची बंपर विक्री केली आहे. अनेक कंपन्यांनी या वर्षात खूप चांगला नफा कमावला आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप ३ इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल येथे जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकाल.

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची मोठी डिमांड

ola S1 Air
ओला इलेक्ट्रिक कंपनीने भारतीय वाहन बाजारात त्यांची सर्वात स्वस्त ओला एस १ एअर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ओला एस १ एयर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने २.५kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. तसेच यात हब माउंटेड इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी ४.५kW पॉवर जनरेट करू शकते. ओला एस १ एअर सिंगल चार्जवर १०१ किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ९० किमी प्रति तास इतका आहे. या स्कूटरची किंमत ८४,९९९ रुपये इतकी आहे.

Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

(हे ही वाचा : Flashback 2022: ‘या’ आहेत देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV कार; मायलेजच्या बाबतीत आहेत दमदार )

TVS iQUBE
TVS ने भारतात आपली २०२२ TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. iQube च्या या मॉडेलमध्ये ४.४ kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. जी ७८ किमी/ताशी वेग गाठू शकते आणि पूर्ण चार्ज केल्यावर ७५ किमी पर्यंत जाऊ शकते. एक तास चार्ज करून ही स्कूटर २० किलोमीटर चालवता येऊ शकते. कंपनी बॅटरी पॅकवर ३ वर्षांची वॉरंटी देत ​​होती.

Hero Vida V1
हिरो मोटोकॉर्प कंपनीने आपली Hero Vida V1 ही इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) बाजारात आणली आहे. Hero Vida V1 या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ८०Kmph आहे. स्कूटरमध्ये ८-इंचाची TFT डॅश टच स्क्रीन वापरण्यात आली आहे. डॅशमध्ये स्मार्टफोन पेअरिंग देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरण्यात येणारी बॅटरी हीरोनेच विकसित केली आहे. यामुळे बॅटरीचे आयुष्य अधिक असणार आहे.

TVS Ntorq XT

TVS Ntorq 125 XT भारतात लॉंच करण्यात आली आहे. ही स्कूटर नियॉन ग्रीन कलरमध्ये हायब्रिड TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह येते. याशिवाय यात आधुनिक व्हॉइस असिस्टंटची सुविधा देखील उपलब्ध आहे.   TVS Ntorq 125 XT हे हलके आणि स्पोर्टी अलॉय व्हीलसह येते. या TVS स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १,०२,८२३ रुपये ठेवण्यात आली आहे.