Car and Bike Mileage: पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणारी वाहने लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस इंधन वाचवण्यासाठी शक्य तो प्रयत्न करतांना दिसत आहे. इंधन वाचवण्यासाठी अधिक मायलेज असणाऱ्या गाड्या वापरणं हा उत्तम पर्याय आहे. जर तुमची कार अचानक कमी मायलेज देत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपल्या कारचे किंवा बाईकचे मायलेज कसे वाढवता येऊ शकते, यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

‘असे’ वाढवा तुमच्या कारचे किंवा बाईकचे मायलेज

इंधन बदल

गाडी एक ठराविक अंतर चालल्यानंतर गाडीची तपासणी करणे आवश्यक असते. तसेच ठराविक कालवधी नंतर गाडीतील इंधन बदल करणं गरजेच असते.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
Upvas special naivedya special batata bhaji
बटाटयांची सुकी भाजी; नैवेद्याच्या पानावर वाढली जाणारी बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा

कार सर्विस

कारच्या सर्विसचा गाडीच्या मायलेजवर चांगला परिणाम पडतो. कारची सर्विस केल्यानंतर इंजिन चांगले काम करते.

(आणखी वाचा : Second Hand Bike: अरे वा! फक्त १५ हजारात घरी आणा ‘ही’ १ लाखाची बाईक; मिळेल जबरदस्त मायलेज आणखी बरंच काही )

गरजेनुसार वाहन सुरु ठेवणे

वाहतूक कोंडी किंवा कुणाची वाट बघत असतांना अनेकदा गरज नसतांना आपण वाहन सुरु ठेवतो. पण असे केल्यास गाडीचा मायलेज कमी होतो आणि तुमची गाडी अधिक इंधन वापरते.

क्रुझ कंट्रोलचा वापर

हल्ली अत्याधुनिक वाहनांत मोठ्या प्रमाणावर क्रुझ कंट्रोल सुविधेचा वापर होतांना दिसतो. क्रुझ कंट्रोल सुविधेच्या मदतीने गाडीची वेगमर्यादा निश्चित करता येते. क्रुझ कंट्रोलमुळे गाडीला चांगला मायलेज मिळायला मदत होते.

कारची स्पीड

जर तुम्हाला जास्त मायलेज हवे असेल तर आपली कार ४५ ते ६० या किलोमीटर प्रति वेगाने गाडी चालवा. या स्पीडमध्ये सर्वात जास्त रेंज देते. कारला जास्त वेगाने आणि कमी हळून चालवल्याने मायलेज कमी होते.

(आणखी वाचा : मस्तच! तरुणांना वेड लावणारी ‘ही’ जबरदस्त क्रूझर बाईक फक्त २ हजारात बुक करा; फीचर्समध्ये आहे टाॅपवर, जाणून घ्या बाईकची खासियत )

योग्य गियर वापरा

वाहन चालवताना लोअर गियर वापरा आणि हळूहळू तो वाढवा. यामुळे इंजिनवर ताण येत नाही. वाहनच्या इंजिननुसार गिअर देखील वापरावे. १५० सीसी इंजिन असणार्‍या वाहनास ५५ किमी प्रति तासाच्या वेगाने थर्ड गिअरने चालवले जावे. यावर जाण्याने इंजिनवर ताण येईल जे माइलेजवर परिणाम करेल.

जीपीएस वापर

जीपीएसच्या वापरामुळे वाहनचे मायलेज वाढवण्यात मदत होऊ शकते. कोणत्या मार्गावर जास्त ट्रॅफिक आहे हे शोधण्यासाठी जीपीएसचा वापर होऊ शकतो. जीपीएसद्वारे कमी अंतराचा रुट शोधला जाऊ शकतात. यामुळे वाहनाचे मायलेजही वाढते.