Football Player Cristiano Ronaldo: दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने एक आकर्षक नवीन आलिशान कार भेट दिली आहे. यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या या आलिशान कारमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्या या कारची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. चला तर जाणून घेऊया ख्रिस्तियानोच्या या कारमध्ये काय आहे खास.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारचे नाव काय?

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
a man performed amazing belly dance
Video : ‘तो’ आला, पट्टा बांधला आणि मग जो बेली डान्स केला, लोकांची नजरच हटेना, नेटकरी म्हणे, “मलायका फेल..”
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नव्या कारचे नाव ‘रोल्स रॉयस डॉन’ (Rolls-Royce Dawn)असे असून या कारची किंमत सुमारे सात कोटी रुपये आहे. अलीकडेच, त्याच्या या कारचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये रॉड्रिग्जची गिफ्टिंग कार अनेकांच्या पसंतीस पडली आहे.

(हे ही वाचा : Ratan Tata Car Collection: रतन टाटांचं कार कलेक्शन पाहून तुम्हीही व्हाल थक्क; ताफ्यात ‘इतक्या’ महागड्या कार )

रॉड्रिग्जने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती ख्रिसमसच्या निमित्ताने रोनाल्डला एक आलिशान कार भेट देतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोनाल्ड एक उत्तम गिफ्ट मिळाल्यानंतर खूप आनंदी दिसत आहे. यानंतर रोनाल्डोने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली आहे आणि लक्झरी गिफ्टसाठी आपल्या मैत्रिणीचे आभारही मानले आहेत.

‘अशी’ आहे या कारची खासियत
२०१५ मध्ये Rolls-Royce ने जुन्या Phantom drophead coupe च्या बदली म्हणून The Dawn लाँच केले होते. ते जवळजवळ ७ वर्षे उत्पादनात होते. Rolls-Royce Dawn ६.६-लीटर ट्विन-टर्बो चार्ज केलेले V12 इंजिनसह येते. हे इंजिन ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडलेले आहे. हे V12 इंजिन कमाल ५७१ PS पॉवर आणि ८२० Nm कमाल टॉर्क जनरेट करते. Rolls-Royce ने दावा केला की, डॉन ४.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवण्यास सक्षम आहे. त्याचा टॉप स्पीड २५० किमी प्रतितास आहे.