Force Citiline 10 Seater Car: देशांतर्गत कार उत्पादक फोर्स मोटर्स (Force Motors) ने काही काळापूर्वी भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लाँच केली होती. याला ‘Force Citiline’ असे नाव देण्यात आले आहे, जी कंपनीच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरची अद्ययावत आवृत्ती आहे. कुटुंब आणि मित्रांसह लांबच्या सहलींसाठी सिटीलाइन हा योग्य पर्याय असल्याचे, कंपनीचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे, सर्व सीट्स फॉरवर्ड फेसिंग डिझाइनसह येतात, ज्यामुळे तुम्हाला टॅक्सी वाटणार नाही. खास गोष्ट म्हणजे लूकच्या बाबतीत ती कोणत्याही ऑफरोड एसयूव्हीपेक्षा कमी दिसणार नाही.

सीटिंग लेआउट कसा आहे?

फोर्स सिटीलाईनमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त ९ लोक बसू शकतात. साधारणपणे ७ सीटर कार ३ रांगांच्या असतात. परंतु फोर्स सिटीलाईनमध्ये ४ लाईन देण्यात आल्या आहेत. यात पहिल्या रांगेत २ लोक, दुसऱ्या रांगेत ३ लोक, तिसऱ्या मध्ये २ लोक आणि चौथ्या मध्ये ३ लोक बसू शकतात.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Divorce tendency of financially capable women
सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?

(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ देशातील सर्वात सुरक्षित कारसमोर Mahindra XUV700 ही फेल, किंमत फक्त ६ लाख)

आकार आणि इंजिन

फोर्स सिटीलाइन आकाराने खूप मोठी आहे. याची ५१२०mm लांबी, १८१८mm रुंदी, २०२७mm उंची आणि ३०५०mm व्हीलबेस आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स १९१ मिमी आहे. या MUV ची पुढची रचना तुम्हाला टाटा सुमोची आठवण करून देईल. Citiline २.६-लिटर डिझेल इंजिनसह येते जे ९१ अश्वशक्ती आणि २५० Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात ६३.५ लीटरची इंधन टाकी, ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ३१४० किलो वजन आहे.

वैशिष्ट्ये

यात शक्तिशाली ड्युअल एअर कंडिशनिंग, सेंट्रल लॉकिंग पॉवर विंडो, मल्टिपल यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, मागील पार्किंग सेन्सर्स, बॉटल होल्डर आणि सामानासाठी फोल्डिंग-प्रकारच्या शेवटच्या-रो सीट्स यांसारखी अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. प्रवासी आरामात वाहनात प्रवेश करू शकतात आणि बाहेर पडू शकतात.

किंमत

या कारची सुरुवातीची किंमत १६.५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.