scorecardresearch

विराट कोहलीने का विकल्या कोट्यवधींच्या लक्झरी कार, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

Virat Kohl: विराट कोहलीने का विकल्या इतक्या महागड्या कार, जाणून घ्या कारण…

Virat Kohli Has Sold Most Cars
विराट कोहलीने विकल्या कोट्यवधींच्या कार (Photo-indianexpress)

Why Did Virat Kohli Sold His Expensive Cars: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. एकेकाळी वडिलांच्या स्कूटरवरून क्रिकेट अकॅडमीत जाणाऱ्या विराटकडे आज अनेक अलिशान कार आहेत. विराट कोहली त्याच्या लक्झरी लाईफसाठी ओळखला जातो. विराटची कमाई कोट्यवधीच्या घरामध्ये आहे. विराट कोहलीला ऑडी कंपनीच्या गाड्यांची विशेष आवड आहे. विराटकडे देशी ते विदेशीपर्यंतच्या गाड्यांचा मोठा कलेक्शन आहे. कोहलीला जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा तो त्याच्या कारने फिरायला जातो. मात्र, माजी कर्णधाराने आपल्या बहुतांश महागड्या गाड्या विकल्याचा नुकताच खुलासा केला आहे.

कोहलीने महागड्या गाड्या का विकल्या?

आरसीबी शोमध्ये बोलताना विराटने सांगितले की, त्याच्याकडे अशा अनेक गाड्या होत्या, ज्यांचा काही उपयोग नव्हता. तो म्हणाला, “त्यामधील बहुतांश कार खरेदी करण्याचा निर्णय हा अव्यवहार्य होता. मी क्वचितच गाडी चालवली किंवा त्यांपैकी बर्‍याच गाड्यांमधून प्रवास केला. काही वेळानंतर मला वाटले की, ते सर्व वाया गेले आहे.” म्हणून मी त्यापैकी बहुतेक गाड्या विकल्या आणि आता माझ्याकडे आहेत त्याच कार मी वापरतो.”

(हे ही वाचा : स्वप्न करा पूर्ण! आली रे आली, BMW ची सर्वात स्वस्त SUV, अवघ्या ७ सेकंदात १०० किमीचा वेग)

विराट आरसीबीसाठी दणदणाट करण्यास तयार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना विराट कोहलीची आयपीएलमधील कामगिरी अप्रतिम राहिली आहे. मात्र, गेल्या हंगामात त्याचा फॉर्म घसरला आणि तो ११५.९९ च्या स्ट्राइक रेटने केवळ ३४१ धावाच करू शकला. आता IPL 2023 मध्ये विराट कोहली नव्या रुपात परतला आहे. कोहलीने गेल्या एका वर्षात चांगल्या धावा केल्या आहेत आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या