scorecardresearch

Tiago ते Harrier पर्यंत, टाटा मोटर्स ‘या’ गाड्यांवर देत आहेत बंपर सूट; जाणून घ्या तपशील

तुम्हालाही या डिस्काउंटसह टाटा मोटर्सची कार घ्यायची असेल, तर जाणून घ्या कंपनी कोणत्या कारवर किती सूट देत आहे.

Tata Motors
बंपर सूट (फोटो- TATA MOTORS)

नवीन वर्षाच्या निमित्ताने, देशातील आघाडीची ऑटोमेकर टाटा मोटर्स निवडक कारवर बंपर सवलत देत आहे ज्यात रोख सवलतींव्यतिरिक्त एक्सचेंज, बोनस, कॉर्पोरेट सूट आणि इतर फायदे समाविष्ट आहेत.टाटा मोटर्सची ही सवलत कंपनीच्या टाटा हॅरियर, सफारी, टिगोर, टियागो आणि नेक्सन सारख्या कारवर दिली जात आहे. कंपनीची ही सवलत ऑफर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वैध आहे परंतु ग्राहकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन ती आणखी वाढवता येऊ शकते. तुम्हालाही या डिस्काउंटसह टाटा मोटर्सची कार घ्यायची असेल, तर जाणून घ्या कंपनी कोणत्या कारवर किती सूट देत आहे.

टाटा हॅरियर (Tata Harrier)

ही त्यांच्या कंपनीची एक प्रीमियम SUV आहे, ज्यावर कंपनीकडून ८५,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, परंतु ही सवलत ऑफर फक्त टाटा हॅरियरच्या २०२१ च्या मॉडेलवरच वैध असेल.या सवलतीमध्ये ६० हजार रुपयांची रोख सूट दिली जाईल, त्यासोबतच एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. परंतु तुम्ही टाटा हॅरियरचे २०२२ मॉडेल विकत घेतल्यास, कंपनी ४०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि २५,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील दिला जाईल.

(हे ही वाचा: अवघ्या ४ लाखांच्या बजेटमध्ये उत्तम बजेट देणाऱ्या ‘या’ आहेत टॉप ३ कार!)

टाटा सफारी (Tata Safari)

ही त्यांच्या कंपनीची लोकप्रिय SUV आहे, ज्यावर कंपनी ६० हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सवलत फक्त टाटा सफारीच्या २०२१ मॉडेलवर लागू होईल ज्यामध्ये ६०,००० रुपयांच्या रोख सवलतीसह एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल. पण जर तुम्ही टाटा सफारीचे २०२२ मॉडेल खरेदी केले तर कंपनी त्यावर ४० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल.

(हे ही वाचा: KIA च्या नवीन कार ‘Carens’ MPV चे बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या फीचर्स)

टाटा टिगोर (Tata Tigor)

ही एक शक्तिशाली लो-बजेट सेडान कार आहे, ज्यावर कंपनी ३५,००० पर्यंत सूट देत आहे, जी तिच्या २०२१च्या मॉडेलवर लागू होईल. पण जर तुम्ही या कारचे २०२२ मॉडेल विकत घेतले तर कंपनी त्यावर २० हजार रुपयांची कॅश डिस्काउंट आणि १० हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देणार आहे.

(हे ही वाचा: प्रीमियम फीचर्स, कमी किमतीत आणि जास्त मायलेज असलेल्या ‘या’ आहेत भारतातील टॉप ३ कार!)

टाटा टियागो (Tata Tiago)

ही कमी-बजेट लाँग-मायलेज हॅचबॅक आहे ज्यावर कंपनी ३०,००० रुपयांची सूट देत आहे जी त्याच्या २०२१ मॉडेलवर लागू होईल. त्याचे २०२२ मॉडेल विकत घेतल्यावर, कंपनी २० हजार रुपयांची रोख सूट आणि एक्सचेंज बोनससह ५ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील दिली जाईल.

(हे ही वाचा: Hero Pleasure Plus vs Honda Activa 6G: किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणता आहे सर्वोत्तम पर्याय? जाणून घ्या)

टाटा नेक्सन (Tata Nexon)

ही एक स्टायलिश आणि भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे, ज्यावर कंपनी 25 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सवलत २०२१च्या डिझेल मॉडेलवर लागू होईल ज्यामध्ये कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2022 at 15:13 IST