scorecardresearch

Maruti, Audi, Mercedes चा गेम होणार; BMW यंदा भारतात दाखल करणार १९ कार, सगळ्यांचेच वाजणार बारा

BMW Upcoming Cars: बीएमडब्ल्यू (BMW) लग्झरी वाहन निर्मात्या कंपनीने या वर्षी भारतात १९ कार लाँच करण्याची योजना आखली आहे.

BMW To Launch 19 Cars This Year
BMW यंदा १९ कार लाँच करणार (Photo-financialexpress)

BMW To Launch 19 Cars This Year: जर्मन कार निर्माता ऑटोमोटिव्ह ग्रुप BMW लग्झरी कंपनी BMW यावर्षी भारतात १९ कार मॉडेल लाँच करण्याची योजना आखत आहे.  यामध्ये इलेक्ट्रिक कारचाही समावेश करण्यात येणार आहे. वर्षभरात १९ मॉडेल्स लाँच करणे ही कोणत्याही कार कंपनीसाठी मोठी गोष्ट आहे, मग ती BMW असो किंवा बजेट कार बनवणारी मारुती सुझुकी ऑडी, मर्सिडीज इत्यादी…

समूहाने यावर्षी भारतात बीएमडब्ल्यू मोटोराड व्यवसायांतर्गत केवळ १९ कारच नव्हे तर तीन बाईक मॉडेल्स सादर करण्याची योजना आखली आहे. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावह म्हणाले, “आम्ही यावर्षी २२ उत्पादने ऑफर करणार आहोत, ज्यात १९ कार आणि तीन बाईक आहेत.

(हे ही वाचा : ऐकलं का… मारुतीची लोकप्रिय कार फक्त १ रुपयात खरेदी करता येणार, ऑफर फक्त ‘इतक्या’ दिवसांसाठी…)

काही मीडिया रिपोर्ट्स असे सूचित करतात की, BMW Motorrad इलेक्ट्रिक बाइकवर देखील काम करत आहे, जी मेड-इन-इंडिया BMW G310 R वर आधारित असू शकते. कंपनी TVS च्या सहकार्याने याची निर्मिती करेल, असा अंदाज आहे. मात्र, BMW Motorrad कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कंपनीला भारतीय बाजारपेठेतील दुहेरी आकडी वाढ कायम ठेवायची आहे. BMW २०२३ मध्ये देशातील विक्रीत सुधारणा करेल, अशी अपेक्षा आहे. कंपनीला अपेक्षा आहे की, तिच्या एकूण विक्रीपैकी १५ टक्के इलेक्ट्रिक वाहने असतील.

कंपनीने लाँच केलेल्या नवीन १९ मॉडेल्समध्ये नवीन ऑफर तसेच काही फेसलिफ्टेड आवृत्त्या असतील. कंपनी देशात पेट्रोल आणि डिझेल कारसह इलेक्ट्रिक रेंजचा विस्तार करणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 10:22 IST

संबंधित बातम्या