Godawari Electric Motors Eblu Feo X : आजकाल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ आहे. पेट्रोलच्या नियमित वाढणाऱ्या भावांमुळे मध्यमवर्गीयांना इलेक्ट्रिक गाड्या घेणे सध्या परवडते. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज भारतातील पहिली फॅमिली ई-स्कूटर इब्लू फिओ एक्सच्या नवीन व्हेरिएंटच्या लाँचची घोषणा केली आहे. हे कंपनीचे भारतातील ईव्ही दुचाकी विभागामधील दुसरे उत्पादन आहे. भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये इब्लू फिओ एक्सचे अनावरण करण्यात आले होते. किंमत काय? या नवीन व्हेरियंटची किंमत INR ९९,९९९ (एक्स-शोरूम) आहे, जी इलेक्ट्रिक स्कूटर उत्साही लोकांसाठी परवडणारा पर्याय देत आहे. इब्लू फिओ एक्स आता २८ लिटर स्टोरेज स्पेससह ऑफर करण्यात येईल. या ई-स्कूटरमध्ये २.३६ केडब्ल्यू बॅटरी असेल आणि ती ११० किमी रेंज देईल. अतिरिक्त वैशिष्ट्ये इब्लू फिओ एक्स पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे, सायन ब्ल्यू, वाईन रेड, जेट ब्लॅक, टेली ग्रे व ट्रॅफिक व्हाइट. रात्रीच्या प्रवासादरम्यान स्पष्ट दृश्यमानतेसाठी उच्च-रिझोल्युशन AHO एलईडी हेडलॅम्प व एलईडी टेल लॅम्पदेखील यात समाविष्ट आहे. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये पुढील आणि मागील दोन्हीसाठी सेन्सर इंडिकेटरसह साइड स्टॅण्ड आणि १२ इंचांचे अदलाबदल करण्यायोग्य ट्यूबलेस टायर्स यात समाविष्ट आहेत. इब्लू फिओ एक्स सोई लक्षात घेऊन डिझाइन केले आहे. त्यामध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. त्याचा प्रशस्त फ्लोअरबोर्ड गॅस सिलिंडरदेखील ठेवू शकतो; ज्यामुळे त्याची व्यावहारिकता वाढते. स्कूटरमध्ये एक सुलभ स्टोरेज बॉक्स आणि मोबाईल चार्जिंग पॉइंटदेखील समाविष्ट आहे; ज्यामुळे तुम्ही प्रवास करताना तुमचा फोन चार्ज करू शकता. हेही वाचा >> Fastag New Rules: १ ऑगस्टपासून फास्टॅगचे नियम बदलणार; वाहन काढण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा नाहीतर भरावा लागेल दुप्पट टोल इब्लू फिओ एक्सची फीचर्स : २.३६ केडब्ल्यू लि-आयन बॅटरी उच्च पॉवरसाठी ११० एनएम सर्वोच्च टॉर्कची निर्मिती करते. तीन ड्रायव्हिंग मोड्स : इकॉनॉमी, नॉर्मल व पॉवर रायडरच्या ड्रायव्हिंग स्टाईलला अनुसरून आहेत, तसेच ई-स्कूटरच्या विशिष्टतेमध्ये अधिक भर करतात. विनासायास प्रवासासाठी एका चार्जमध्ये आरामदायी ११० किमी रेंज देते. लांबच्या प्रवासादरम्यान आरामदायी प्रवासासाठी ६० किमी/प्रतितासाची अव्वल गती. बॅटरीवरील ताण कमी करण्यासाठी आणि ड्रायव्हिंग रेंज वाढविण्यासाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. १८५० मिमीची लक्षणीय लांबी इब्ल्यू फिओला आकर्षक उपस्थिती देते. रस्त्यांवरील अडथळे व चढ-उतारांचा सामना करण्यासाठी १७० मिमी ग्राऊंड क्लीअरन्स १३४५ मिमी व्हीलबेस या व्हेईकलला अत्यंत आरामदायी फॅमिली स्कूटर बनवते.