EMPS scheme extended : २३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या एनडीए सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ऑटो क्षेत्रात काही विशेष तरतुदी लागू करण्याची अपेक्षा होती. ऑटो क्षेत्रासाठी जरी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या नाही तरी लिथिअम सारख्या खनिजांवरील कस्टम ड्युटी कमी करून इव्ही मॅन्युफॅक्चरिंगला दिलासा दिला आहे.

आता केंद्र सरकारने सध्या सुरू असलेली इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) २०२४ ची मुदत वाढवली आहे. देशभरात ग्रीन मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना आता दोन महिन्यापर्यंत वाढवली आहे. वाहन निर्मिती कंपनी आणि ग्राहक दोन्ही या योजनेचा लाभ ३० सप्टेंबर पर्यंत घेऊ शकतात. (EMPS scheme extended till 30 September)

pm narendra modi sets usd 500 billion target for electronics sector by 2030
इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी ५०० अब्ज डॉलरच्या टप्प्याचे लक्ष्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २०३० पर्यंतचे उद्दिष्ट 
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Recognition of prize shares by Reliance Industries
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून १:१ बक्षीस समभागास मान्यता
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Decision of the Maharashtra government regarding milk subsidy for milk producer Pune news
दूध उत्पादकांना मोठा दिलासा जाणून घ्या, दूध अनुदानाबाबत निर्णय
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज
bharat bandh on august 21
Bharat Bandh : २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या ‘बंद’मागचं नेमकं कारण?
Abhudaya Nagar Residents demand for increased square feet from MHADA in redevelopment Mumbai
अभ्युदय नगर पुनर्विकासात म्हाडाकडून किमान ४९९ चौरस फुटाचे घर! रहिवाशांकडून मात्र ७५० चौरस फुटाची मागणी

हेही वाचा : टोयोटाच्या नव्हे तर ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या ‘या’ सुरक्षित ७-सीटर कारची तुफान विक्री, ६ महिन्यात विकल्या १ लाख गाड्या, किंमत…

या वर्षी EMPS योजनेची FAME-२ समाप्त झाल्यानंतर १ एप्रिलपासून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली होतेी. ही योजना तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आली होती. ही योजना ३१ जुलै ला समाप्त होणार होती. या योजनेद्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे बजेट मांडले होते पण आता ही योजने दोन महिन्यांनी वाढल्यामुळे याचा बजेट ७६९.६५ कोटी रुपये करण्यात आला आहे.

या योजनेद्वारे ५,६०,७८९ इलेक्ट्रिक वाहनांना आर्थिक सहाय्यता मिळणार आहे. ज्यामध्ये ५,००,०८० यूनिट्स इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचा सुद्धा सहभाग आहे.

हेही वाचा : How To Maintain Bike Chain: फक्त २० मिनिटांत स्वच्छ होईल तुमच्या बाईकची चेन; ‘या’ तीन टिप्स करा फॉलो; सुरक्षित होईल तुमचा प्रवास

या योजनेसाठी निर्धारित निधी आहे. EMPS २०२४ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी अनुदान वाहनाच्या प्रत्येक किलोवॅट अवर च्या बॅटरी क्षमतेसाठी ५००० रुपयांचा सहकार्य दिले जाणार. इलेक्ट्रिक दुचाकी किंवा स्कूटीमध्ये दोन किलोवॅटपर्यंत बॅटरी दिली जाणार आहे. या अंदाजाने प्रत्येक स्कुटीच्या खरेदीवर ग्राहकांना १०,००० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त अनुदान दहा हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. म्हणजेच २ किलोवॅट अवर पेक्षा जास्त बॅटरी पॅक असेल तर जास्तीत जास्त जास्त अनुदार १० हजार रुपयांपर्यंत मिळणार.