Great offers on the purchase of Honda City 5th Gen, Honda WR-V, Honda Amaze cars in the month of December | Loksatta

Car Discounts Offers: संधी गमावू नका! होंडाच्या ‘ह्या’ कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; होणार ‘इतकी’ बचत

जपानी ऑटोमोबाईल कंपनी Honda ने भारताच्या बाजारपेठेतील आपल्या काही शानदार कारवर डिस्काउंटची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहक हजारो रुपयांची बचत करू शकतात.

honda
होंडाच्या शानदार कारवर डिस्काउंट. (Pic credit – pixabay)

Cars Discount Offers: या वर्षाच्या सरत्या महिन्यात अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या अनेक लोकप्रिय कारवर बंपर सवलत आणि ऑफर जाहीर केल्यात. यात होंडाची कार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठीही आता चांगली बातमी आलीये. आघाडीची जपानी ऑटोमोबाईल कंपनी Honda ने सुद्धा भारताच्या बाजारपेठेतील आपल्या काही शानदार कारवर डिस्काउंटची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहक हजारो रुपयांची बचत करू शकतात.

या डिसेंबर महिन्यात Honda ने त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या सेडान Honda City आणि Honda Amaze तसेच मध्यम आकाराच्या SUV Honda WR-V च्या खरेदीवर सूट जाहीर केली आहे. यामध्ये हजारो रुपयांची बचत करता येणार आहे. तर बघूया कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळणार.

Honda WR-V

Honda या डिसेंबर महिन्यात आपल्या शानदार मध्यम आकाराची SUV होंडा डब्लूआर-व्ही (Honda WR-V) च्या खरेदीवर एकूण सवलत देत आहे. या कारच्या खरेदीवर कमाल रु.७२,३४० वाचवू शकता. यामध्ये फ्री अॅक्सेसरीजसाठी ३०,००० रुपये किंवा ३५,३४० रुपयांची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. एक्सचेंज बोनसवर २०,००० रुपये, लॉयल्टी बोनससाठी ५,००० रुपये आणि एक्सचेंजवर ७,००० रुपये दिले जात आहेत. याशिवाय यामध्ये ५,००० रुपयांची कॉर्पोरेट सूटही उपलब्ध आहे.

(आणखी वाचा : फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 83kmpl मायलेजवाली ही बाईक; वाचा काय आहे ऑफर)

Honda City 5th Gen

ही कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे. होंडा 5th जनरेशन सिटी कारवर डिस्काउंट देत आहे. या कारवर डिसेंबरमध्ये कमाल ७२,१४५ रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये ३०,००० रुपयांपर्यंत रोख सूट किंवा ३२,१४५ रुपयांच्या FOC अॅक्सेसरीजचा पर्याय दिला जात आहे. यासोबतच लॉयल्टी बोनसवर ५,००० रुपयांपर्यंत आणि कार एक्सचेंजवर ७,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी ८,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये कार एक्सचेंज डिस्काउंट म्हणून २०,००० रुपये दिले जात आहेत.

Honda Amaze

होंडाने भारतात Honda Amaze नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच केली. कंपनीने आपल्या या लोकप्रिय सेडान कारमध्ये काही बदल केले असून आधीच्या तुलनेत ही कार शानदार दिसतेय. स्टाइल आणि लेटेस्ट फीचर्ससोबतच Amaze फेसलिफ्ट कारच्या डिझाइनमध्येही काही कॉस्मेटिक बदल झालेत. Honda Amaze च्या खरेदीवर एकूण ४३,१४४ रुपये वाचवण्याची संधी आहे. १०,००० रुपयांची रोख सूट किंवा १२,१४४ रुपयांची अॅक्सेसरीज सूट आहे. याशिवाय, ५,००० रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस आणि ६,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे. त्याच वेळी, कारच्या एक्सचेंजवर २०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:02 IST
Next Story
फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 83kmpl मायलेजवाली ही बाईक; वाचा काय आहे ऑफर