हार्ले डेव्हिडसन बाईकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेकदा ऑफरोडिंगसाठी या बाईक्सना पसंती असते.   कंपनी आपल्या नवनव्या बाईक लाँच करत असते. आता कंपनी पुन्हा एकदा मोठा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. आता Hero MotoCorp, भारतातील प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपन्यांपैकी एक, अमेरिकन कंपनी ब्रँड हार्ले डेव्हिडसनच्या सहकार्याने भारतात अधिक प्रीमियम बाइक्स सादर करू शकते. हार्ले डेविडसन X440 लाँच केल्यानंतर मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर हे सांगण्यात आले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, आगामी काळात भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी करारावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ही केवळ भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी नाही तर जगातील सर्वात मोठी स्कूटर आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. Hero Motocorp ने स्वस्त आणि चांगल्या प्रोडक्शनच्या आधारे भारतातील तसेच जगभरातील दुचाकी बाजारात सर्वाधिक ओळख निर्माण केली आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हिरोचाच दबदबा आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक मार्केट शेअरसह ही नंबर-१ टू-व्हिलर बनली कंपनी आहे. आता हार्ले डेव्हिडसनच्या सहकार्याने कंपनी तरुणांसाठी खास बाईक आणण्याच्या तयारीत आहे.

(हे ही वाचा : किंमत २.८९ लाख, मायलेज १९.७१ किमी; मारुतीची ७ सीटर कार स्वस्तात आणा घरी, कुठे मिळतेय शानदार डील? )

सध्या, हार्ले डेव्हिडसन X440 मॉडेलच्या निर्मितीवर Hero Motors बरोबर काम करत आहे. तसेच, हार्ले डेव्हिडसनच्या अधिकाऱ्यांनी हिरोबरोबरच्या संयुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यात हार्लेच्या आणखी प्रीमियम बाइक्स भारतात येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

२०१९ मध्ये हार्ले डेव्हिडसनने भारतात उत्पादन बंद केले होते. यानंतर २०२० मध्ये उत्पादनासाठी Hero MotoCorp बरोबर भागीदारी करण्यात आली. ज्यानंतर X440 गेल्या वर्षी जुलैमध्ये लाँच झाली होती. अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की, X440 च्या मागणीत वाढ झाली आहे आणि Hero ने उत्पादन दर महिन्याला १०,००० युनिट्सवरून वाढवले ​​आहे.

हार्ले डेव्हिडसन X440 किंमत

गेल्या वर्षी लाँच झालेल्या Harley Davidson च्या बाईक X440 चे तीन प्रकार भारतीय बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत २.३० लाख ते २.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) दरम्यान ठेवण्यात आली आहे. या सिंगल सिलेंडर बाईकची इंजिन क्षमता ४४०cc आहे आणि त्यात १३.५ लीटरची इंधन टाकी आहे. यासह, हार्लेच्या ६ स्पीड ट्रान्समिशन बाईकचे मायलेज ३५ kmpl असल्याचे सांगितले जात आहे.