scorecardresearch

अ‍ॅक्टिव्हा-ज्युपिटर विसरा, विक्रीच्या बाबतीत ‘या’ स्कूटरची सगळ्या गाड्यांवर मात

विक्रीतल्या वार्षिक वाढीच्या बाबतीत हिरो डेस्टिनीने होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटरवर मात केली आहे.

hero destini 125
हिरो मोटोकॉर्पची लोकप्रिय स्कूटर डेस्टिनीची विक्री वाढली आहे.

हिरो मोटोकॉर्पचं एक टू व्हीलर मॉडेल असं आहे, ज्याने बाजारात धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्यात या दुचाकीने वार्षिक विक्रीच्या बाबतीत तब्बल १,१२१ टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हिरोने या दुचाकीच्या ६७४ युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये या दुचाकीच्या ८,२३२ युनिट्सची विक्री केली आहे. म्हणजेच एका वर्षात या दुचाकीच्या विक्रीत १,१२१ टक्के वाढ झाली आहे.

आम्ही सध्या हिरो डेस्टिनी १२५ या स्कूटरबद्दल बोलत आहोत. ही स्कूटर बाजारात होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटरला टक्कर देत आहे. अ‍ॅक्टिव्हा आणि ज्युपिटरच्या तुलनेत या स्कूटरची मागणी कमी आहे. परंतु विक्रीत होणाऱ्या वाढीच्या बाबतीत डेस्टिनीने या दोन स्कूटर्सवर मात केली आहे. या स्कूटरच्या मागणीत अलिकडच्या काळात चांगलीच वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला अलिकडच्या काळात अ‍ॅक्टिव्हाच्या वार्षिक विक्रीत मात्र घट नोंदवण्यात आली आहे. तर ज्युपिटरच्या विक्रीत १४ टक्के वाढ झाली आहे. परंतु डेस्टिनीची वाढ खूप मोठी आहे.

हे ही वाचा >> ‘या’ मेड इन इंडिया कारसमोर मारुती, टाटा-महिंद्राच्या सगळ्या गाड्या फेल, ठरली बेस्ट सेलिंग कार, जगभरात धुमाकूळ

कशी आहे हिरो डेस्टिनी?

विक्रीत वाढ होण्याच्या बाबतीत डेस्टिनीने हिरो मोटोकॉर्पच्या सर्व दुचाकींना मागे टाकलं आहे. या स्कूटरमध्ये १२४.६ सीसी क्षमतेचं एअर कूल्ड, ४ स्ट्रोक, एसआय इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ९ बीएचपी पॉवर आणि १०.४ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यात इंजिन फ्यूल इंजेक्शन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यात सेल्फ आणि किक स्टार्ट असे दोन्ही पर्याय मिळतात. यात टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर आणि रियरला स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक डम्पर देण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये ड्रम ब्रेक्स मिळतात. हिरो डेस्टिनीची किंमत ७१,६०८ रुपये ते ८३,८०८ रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 10:27 IST

संबंधित बातम्या