देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, जर एखादी विश्वसनीय कंपनी तुमची इलेक्ट्रिक स्कूटर EMI ऑप्शनमध्ये देण्यास तयार असेल, तर तुमच्यासाठी यापेक्षा चांगले काय असेल. खरं तर, इथे आम्ही Hero Electric च्या Optima इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल माहिती देत आहोत जी तुम्ही फक्त १६६५ रूपयांच्या EMI वर तुमच्या घरी आणू शकता. चला संपूर्ण ऑफर जाणून घेऊया.

Hero Electric Optima वर ऑफर – Hero Optima इलेक्ट्रिक स्कूटरची ex-शोरूम दिल्ली किंमत ५१,४४० ते ६७,४४० रूपयांपर्यंत आहे. जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर ५००० रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी केली तर तुम्हाला ३६ महिन्यांसाठी १६६५ रुपये EMI भरावे लागेल.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Shocking video of washing carrot in river water by vendor
लोकांच्या जीवाशी खेळ! गाजर विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; भाजी विक्रेत्यांचा घृणास्पद VIDEO व्हायरल
voice commands with Gemini AI to finding a specific EV charging station 10 hidden Google Maps features You Know
आता प्रवास होईल अधिक सोपा; Google Maps च्या ‘या’ १० फीचर्सबद्दल जाणून घ्या…
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

Hero Electric Optima चे फीचर्स – हिरो इलेक्ट्रिकने या ई-स्कूटरमध्ये ५१.२ V, ३० Ah लिथियम आयन बॅटरी पॅक दिला आहे. जे ऑप्टिमा इलेक्ट्रिक स्कूटरला एका चार्जमध्ये ८५ किमी पर्यंतची रेंज देते. तसंच या स्कूटरमध्ये लो-बॅटरी इंडिकेटर देखील आहे. सूचित केल्यावर, तुम्ही ते चार्ज करू शकता. दुसरीकडे, Hero Electric Optima मध्ये तुम्हाला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन मिळेल.

आणखी वाचा : वाहन चालवताना High Beam आणि Low Beam लाईट कधी वापरायचं? हे लक्षात ठेवा, अन्यथा अपघाताची भीती असते

जर फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला कॉम्बी ब्रेक सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल कन्सोल, अँटी-थेफ्ट अलार्म, डिजिटल घड्याळ आणि हँडलाइट, टेल लाइट आणि इंडिकेटरमध्ये ब्लब मिळेल.

Hero Electric Optima चे स्पेसिफिकेशन- हिरो इलेक्ट्रिकने Optime ई-स्कूटरमध्ये 250W हब मोटर दिली आहे. तसंच ही इलेक्ट्रिक स्कूटर पुश बटणाने सुरू केली जाऊ शकते आणि तुम्हाला त्यात ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल. याच्या ब्रेकबद्दल बोलायचे झाले तर समोर आणि मागे ड्रम ब्रेक्स उपलब्ध असतील. Hero Electric Optima पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तास लागतात.