Hero HF Deluxe vs TVS Sport:किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणती बाइक वरचढ?, जाणून घ्या

टू व्हीलर सेक्टरमध्ये चांगला मायलेजचा दावा करणार्‍या बाइक्सची यादी मोठी आहे.

Hero-HF-Deluxe-vs-TVS-Sport-2
Hero HF Deluxe vs TVS Sport:किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणती बाइक वरचढ?, जाणून घ्या (Photo- Hero, TVS)

टू व्हीलर सेक्टरमध्ये चांगला मायलेजचा दावा करणार्‍या बाइक्सची यादी मोठी आहे. या बाइकची किंमत ५० हजार रुपयांपासून ८० हजार रुपयांपर्यंत आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगला मायलेज असलेली बाईक घ्यायची असेल, तर येथे जाणून घ्या त्या दोन बाईकची संपूर्ण माहिती ज्या कमी किमतीत चांगले मायलेज देतात. या तुलनेसाठी, आज आमच्याकडे Hero HF Deluxe आणि TVS Sport आहेत, ज्यामध्ये आम्ही या दोघांच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील सांगू.

Hero HF Deluxe: हिरो एचएफ डिलक्स बाइकला तिच्या आकर्षक डिझाइन आणि कमी किमतीमुळे पसंती दिली जाते. कंपनीने चार प्रकारांसह लॉन्च केली आहे. बाइकला सिंगल सिलेंडर ९७.२ सीसी इंजिन देण्यात आले आहे जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.०२ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये, कंपनीने तिच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत. तसेच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ८३ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. हिरो एचएफ डिलक्सची सुरुवातीची किंमत ५४,४८० रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर ६३,७७० रुपयांपर्यंत जाते.

Toyota Lunar Cruiser उतरणार चंद्र आणि मंगळ ग्रहावर!; गाडीची डिझाईन पाहून तुम्हीही व्हाल आवाक

TVS Sport: टीव्हीएस स्पोर्ट कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एक बाइक आहे. तिच्या मायलेज आणि किंमतीमुळे पसंत केली जाते. कंपनीने त्याचे दोन प्रकार बाजारात लॉन्च केले आहेत. बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने १०९.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे इंजिन ८.२९ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, ज्यामध्ये ४-स्पीड गिअरबॉक्स आहे. दिले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे, ज्यामध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. बाईकच्या मायलेजबद्दल, टीव्हीएसचा दावा आहे की ही बाइक ७० किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएस स्पोर्टची सुरुवातीची किंमत ५८,९३० रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटवर ६४,९५५ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hero hf deluxe vs tvs sport bike price and feature rmt

Next Story
Toyota Lunar Cruiser उतरणार चंद्र आणि मंगळ ग्रहावर!; गाडीची डिझाईन पाहून तुम्हीही व्हाल आवाक
फोटो गॅलरी