scorecardresearch

Hero Maestro Edge 110 vs TVS Jupiter: कोणती स्कूटर खरेदी करणं ठरेल फायद्याचं? जाणून घ्या

दुचाकी क्षेत्रातील स्कूटर विभाग कमी बजेटपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत आणि उच्च मायलेज स्कूटरपासून स्पोर्टी डिझाइन आणि हाय-टेक वैशिष्ट्यांसह येतात.

Hero-Maestro-Edge-110-vs-TVS-Jupiter
Hero Maestro Edge 110 vs TVS Jupiter: कोणती स्कूटर खरेदी करणं ठरेल फायद्याचं? जाणून घ्या (फोटो-HERO, TVS)

दुचाकी क्षेत्रातील स्कूटर विभाग कमी बजेटपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत आणि उच्च मायलेज स्कूटरपासून स्पोर्टी डिझाइन आणि हाय-टेक वैशिष्ट्यांसह येतात. जर तुम्ही स्टायलिश आणि जास्त मायलेज देणारी स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्ही ११० सीसी इंजिन असलेल्या या सेगमेंटमधील दोन लोकप्रिय स्कूटरची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तुलनेसाठी आज आमच्याकडे हिरो मॅस्ट्रो एज ११० आणि टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर आहेत. या दोन्ही स्कूटरच्या किंमतीपासून फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

Hero Maestro Edge 110: हिरो मॅस्ट्रो एज ११० स्कूटर कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरच्या गणनेत येते. ही स्कूटर कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ११०.९ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८.१५ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या दोन्ही चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की. ही हिरो मॅस्ट्रो एज ११० स्कूटर ६८ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. हिरो मॅस्ट्रो एज ११० कंपनीने ६६,८२० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह लाँच केली आहे. टॉप व्हेरियंटमध्ये ७१,६२० रुपयांपर्यंत जातो.

Tiger Sport 660 बाइक भारतात लाँच, Kawasaki Versys 650 आणि Suzuki V Strom 650 XT शी असेल स्पर्धा

TVS Jupiter: टीव्हीएस ज्युपिटर ही कंपनीसह देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरपैकी एक आहे. टीव्हीएस मोटर्सने आतापर्यंत या स्कूटरचे पाच प्रकार बाजारात आणले आहेत. टीव्हीएस ज्युपिटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये १०९.७ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.८८ पीएस पॉवर आणि ८.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. हे ट्यूबलेस टायर असून अलॉय व्हीलसह आहेत. मायलेजबद्दल टीव्हीएस मोटर्सचा दावा आहे की ही स्कूटर ६४ किमीचा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएसने ही स्कूटर ६६,९९८ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह बाजारात लॉन्च केली आहे. टॉप व्हेरिएंटवर जाताना ८०,९७३ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hero maestro edge 110 vs tvs jupiter know price feature and mileage rmt

ताज्या बातम्या