Hero ही एक दुचाकी उत्पादक कंपनी आहे. याच कंपनीने Hero MotoCorp लवकरच भारतात एक नवीन स्कूटर लाँच करणार आहे. ही कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन मॉडेल्स बाजारात आणत असते. आता Hero कंपनी कोणती स्कूटर लाँच करणार आहे व किती तारखेला ते जाणून घेऊयात. Maestro Xoom ही स्कूटर उद्या म्हणजेच ३० जानेवारी २०२३ रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे.
Maestro Xoom चे फीचर्स
Hero कंपनी लवकरच Maestro Xoom ही स्कूटर भारतीय बाजारपेठेमध्ये लाँच करणार आहेत. यामध्ये ड्युअल टोन फ्रंट एप्रन, X इंसिग्नियासह एलईडी हेडलॅम्प आणि हँडलबार इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर्स मिळणार आहेत.या स्कूटरमध्ये खास डिझाइन केलेला एलईडी टेललॅम्प देण्यात आला आहे. स्कूटरवरील काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये USB फोन चार्जर, ट्रिप मीटर आणि स्टॉप/स्टार्ट फंक्शन, XTec कनेक्टेड वैशिष्ट्ये, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सूचना टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ओडोमीटर यांचा समावेश आहे.
हेही वाचा : BMW X1 की Audi Q3 कोणती कार खरेदी करणार? जाणून घ्या काय आहे दोघांमधील फरक

कसे आहे Maestro Xoom चे इंजिन ?
Hero Maestro Xoom च्या इंजिन सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास यात ११०.९ सीसीचे इंजिन येते. जे ८ बीएचपी पॉवर आणि ८.७ एनएम टॉर्क पीक जनरेट करते. याला 3S तंत्रज्ञानासह हँडलबारवर एक स्विच बटण, CVT ट्रान्समिशन, सस्पेन्शनसाठी टेलीस्कोपिक फोर्क अपफ्रंट आणि समोर आणि मागील बाजूस मोनो शॉक शोषक असलेले ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
काय असणार किंमत ?
Hero Maestro Edge 110 ची सध्या भारतात किंमत ६८, ८१६ रुपये ते ७३,६१६ (एक्स-शोरूम ) रुपये आहे. आगामी Maestro Xoom ची किंमत तुलनेनं कमी असू शकते. हे मॉडेल ११० सीसीच्या Honda Activa Smart, TVS Jupiter इत्यादींशी स्पर्धा करेल.