Hero motocorp bikes prices increase : हिरो मोटोकॉर्पने १ डिसेंबरपासून आपल्या वाहनांची (एक्स शोरूम) किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. १ डिसेंबर २०२२ पासून हिरोच्या वाहनांची किंमती १ हजार ५०० रुयांनी वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहवालांनुसार, एकूणच महागाईमुळे कंपनीच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे, असे हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वित्तीय अधिकारी निरंजन गुप्ता यांनी म्हटले. तसेच, ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कंपनी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा उपाय देत राहील, असेही गुप्त यांनी म्हटले.

(अबब! ५०० दशलक्ष व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा विक्रीला काढला, हॅकरने इतकी लावली किंमत, ‘या’ देशांतील युजर्सचा समावेश)

ऑक्टोबर २०२२ मध्ये हिरो कंपनीने ४ लाख ५४ हजार ५८२ दुचाकी विकल्या आणि विक्रीत १७ टक्के वर्ष दर वर्ष घट नोंदवली. यातील ४ लाख ४२ हजार ८२५ युनिट्स देशांतर्गत बाजारात विकले गेले आणि उर्वरित ११ हजार ७५७ युनिट्स इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आले. टीम बचत कार्यक्रमांना गती देत असून याने पुढील खर्चाचा प्रभाव भरून काढण्यात आणि मार्जिनमध्ये सुधारणा करण्यात मदत होईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp bikes prices will increase from 1 december 2022 ssb
First published on: 27-11-2022 at 16:26 IST