Hero MotoCorp: Hero MotoCorp कंपनी देशात ६ मार्च रोजी मोठा धमाका करणार आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही तारीख सेव्ह करण्यास सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील या तारखेचे प्रमोशन करत आहेत.

Hero MotoCorp ने त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर एक टीझर इमेज जारी केली आहे, ज्यात ६ मार्च २०२३ रोजी होणारी एक प्रमुख घोषणा सांगितली आहे. दुचाकी निर्मात्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा फोटो पोस्ट केला आहे. कलाकार कंपनीच्या स्कूटरचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. आता या तारखेला भारतीय बाजारपेठेत OBD2-A-अनुरूप स्कूटर्स लाँच होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

सोशल मीडियावर केले पोस्ट

Hero MotoCorp ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक अतिशय मनोरंजक संदेश पोस्ट केला आहे. “अहो मित्रांनो, दिल फिर से धक धक कर रहा है? काहीतरी सुपर येत आहे. फक्त ६ मार्चपर्यंत प्रतीक्षा करा,” कंपनीने संदेशात म्हटले आहे. या मेसेजबाबत वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.

(हे ही वाचा : संधी गमावू नका! भारतीय बाजारात धुमाकूळ घालणारी स्कूटर फक्त १० हजारात आणा घरी, 64 kmpl मायलेज )

लक्षात घ्या की, Honda 2Wheelers India, Suzuki Motorcycles India आणि India Yamaha Motors सारख्या प्रतिस्पर्धी ब्रँडने नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी त्यांची अनेक मॉडेल्स आधीच अपडेट केली आहेत. ही ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स सिस्टीम सिस्टीममधील बिघाड शोधण्यात मदत करते आणि वाहन सिस्टीममधील कोणत्याही दोषांना सूचित करण्यासाठी कन्सोल दिवे प्रकाशित करते.

Hero MotoCorp च्या स्कूटर पोर्टफोलिओमध्ये Pleasure Plus, Destini 125, Maestro Edge 110, Maestro Edge 125 आणि नव्याने लाँच झालेल्या Xoom चा समावेश आहे. लक्षात ठेवा की, अगदी अलीकडेच लाँच केले गेले असूनही, Xoom अद्याप OBD2-A अनुरूप नाही. अद्ययावत स्कूटर श्रेणी आउटगोइंग मॉडेल्स प्रमाणेच वैशिष्ट्ये दर्शविते. दरम्यान, Hero MotoCorp 2023 साठी निवडक मॉडेल्ससाठी कलर पॅलेट अपडेट करू शकते.