भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी Hero MotoCorp अखेर देशातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत उतरत आहे. कंपनी आज ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जयपूर येथील ग्लोबल सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) येथे आपली पहिली ई-स्कूटर सादर करणार आहे. कंपनी आपल्या ई-मोबिलिटी ब्रँड Vida अंतर्गत ही ई-स्कूटर सादर करणार आहे. लॉन्च करण्यापूर्वी या स्कूटरची चाचणी सुमारे २ लाख किमी चालवून केली गेली आहे, जेणेकरून ग्राहकांना खरेदी केल्यानंतर कोणतीही अडचण येऊ नये. बाजारात दाखल झाल्यानंतर ही ई-स्कूटर बजाज चेतक, ओला एस१, ओकिनावा आणि टीव्हीएस आयक्यूबशी स्पर्धा करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैशिष्ट्ये

कंपनीने अद्याप या ई-स्कूटरची माहिती जाहीर केलेली नाही. पण मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार, या स्कूटरमध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मोटर ३kW चा पीक पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. असे सांगितले जात आहे की एकदा चार्ज केल्यानंतर ही ई-स्कूटर सुमारे २५ किमी नॉन-स्टॉप चालवता येते. हिरो कंपनीच्या या पहिल्या ई-स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी लॅम्प, स्मार्ट सेन्सर, फिक्स्ड सेटअप बार, सिंक्रोनाइझ ब्रेकिंग सिस्टीम, हायड्रॉलिक डिस्क ब्रेक यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये पाहता येतील.

आणखी वाचा : Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉंच; Pixel 7 Pro मध्ये 50MP कॅमेरा अन् मिळणार बरचं काही; किंमत पाहा…

बॅटरी

Hero MotoCorp चे E-Scooter बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासह येईल. यासाठी कंपनीने तैवानस्थित गोगोरोसोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी बॅटरी उत्पादन आणि स्वॅपिंग तंत्रज्ञानामध्ये तज्ञ मानली जाते. या तंत्रज्ञानाअंतर्गत यूजर्स स्कूटरची बॅटरी स्वतः बदलू शकणार आहेत. देशातील चार्जिंग स्टेशन वाढवण्यासाठी हिरो कंपनीने बीपीसीएलसोबत भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून बंगळुरू, दिल्लीसह देशातील ७ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा तयार करतील.

स्कूटरची किंमत

कंपनीने या पहिल्या ई-स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. तरी या स्कूटरची किंमत ८० हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp to launch maiden electric scooter pdb
First published on: 07-10-2022 at 10:44 IST