Hero XOOM 110cc: स्‍कूटर विभागातील आपल्‍या तंत्रज्ञान सक्षम प्रवासाच्‍या पुढील टप्‍प्‍याचा शुभारंभ करत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने आज सोमवारी ३० जानेवारी रोजी नवीन Hero Xoom 110cc Scooter लाँच केली. दैनंदिन प्रवासात साहस व उत्साह शोधणाऱ्या ग्राहकांच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी बारकाईने डिझाइन आणि विकसित केलेली झूम स्कूटर समकालीन डिझाइन, उत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी, अतुलनीय गतीशीलता आणि असाधारण कार्यक्षमता देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hero Xoom 110 styling, features

हिरो झूममध्‍ये ११० सीसी श्रेणीमधील नवीन वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. इंडस्‍ट्री-फर्स्‍ट वैशिष्‍ट्य – हिरो इंटेलिजण्‍ट कॉर्नरिंग लाइट (एचआयसीएल) आणि सेगमेंट-फर्स्‍ट वैशिष्‍ट्ये – अधिक मोठे व अधिक रूंद टायर्स, ११० सीसी विभागातील गतीशील अॅक्‍सेलरेशन यासह ही स्‍कूटर मालकांना अद्वितीय गतीशीलता अनुभवाची खात्री देते.
हिरो इंटेलिजण्‍ट कॉर्नरिंग लाइटTM (एचआयसीएल) हिरो झूमसह ११० सीसी विभागात पदार्पण करत आहे, ज्‍यामधून ग्राहकांना सुधारित सुरक्षितता मिळेल. एचआयसीएल राइडर वळण घेत असताना किंवा वक्राकार रस्‍त्‍यांकडे राइड करत असताना रस्‍त्‍यावरील अंधारमय कोपऱ्यांवर अद्वितीय प्रखर, सुस्‍पष्‍ट प्रकाश देते. राइडर्सना रस्‍त्‍यावरील कोपरे सुस्‍पष्‍टपणे दिसल्‍यामुळे फायदा मिळतो, ज्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी सुरक्षित राइडिंगची खात्री मिळते.

(हे ही वाचा : Mahindra च्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV ची ५ दिवसातच झाली बंपर बुकिंग, खरेदीसाठी लागल्या रांगा )

Hero Xoom 110 किंमत

झूममध्‍ये शक्तिशाली बीएस-६ प्रमाणित इंजिन आहे, ज्‍यामध्‍ये हिरो मोटोकॉर्पचे क्रांतिकारी आय३एस तंत्रज्ञान (इंडल स्‍टॉप-स्‍टार्ट सिस्‍टम) आहे. नवीन डिजिटल स्‍पीडोमीटरसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आणि साइड-स्‍टॅण्‍ड इंजिन-कट-ऑफ स्‍कूटरच्‍या टेक प्रोफाइलमध्‍ये अधिक भर करतात. शीट ड्रम, कास्‍ट ड्रम व कास्‍ट डिस्‍क या तीन व्‍हेरिण्‍ट्समध्‍ये लाँच करण्‍यात आलेली हिरो झूम स्‍कूटर देशभरातील हिरो मोटोकॉर्प डीलरशिप्‍समध्‍ये INR ६८,५९९ (एलएक्‍स – शीट ड्रम), INR ७१,७९९ (व्‍हीएक्‍स – कास्‍ट ड्रम) आणि INR ७६,६९९ (झेडएक्‍स – कास्‍ट ड्रम) या किंमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे.

हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर (सीजीओ) रणजीवजीत सिंग म्‍हणाले, ‘‘वर्षानुवर्षे हिरो मोटोकॉर्पने आयकॉनिक ब्रॅण्‍ड्स सादर केले आहेत, ज्‍यांनी देशवासीयांचे लक्ष वेधून घेण्‍यासोबत प्रबळ ग्राहक कनेक्‍टचा आनंद घेत आहेत. हिरो झूमची अद्वितीय स्‍टाइल व कार्यक्षमतेसह आम्‍ही स्‍कूटर विभागाला पुनर्परिभाषित करण्‍यासाठी नवीन टप्‍पा रचत आहोत.

(हे ही वाचा : Tata च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने २.५ वर्षांत केली तब्बल १४ लाख रुपयांची बचत, बॅटरीमध्येही आली नाही अडचण )

‘अॅडवान्‍स्‍ड लायटिंग’ पॅकेजसह फ्यूचरिस्टिक डिझाइन

नवीन हिरो झूममध्‍ये रॅडिकल नवीन फ्यूचरिस्टिक डिझाइन शैली आहे. वाहतूकीमध्‍ये गतीशील व चपळ, पण खडतर प्रदेशात अत्‍यंत प्रबळ असलेल्‍या या स्‍कूटरची गतीशीला अनोखा राइडिंग अनुभव देते. अत्‍यंत स्‍पोर्टी, पण परिपक्‍व व आरामदायी असलेली ही स्‍कूटर दररोज साहसी राइडिंगसाठी परिपूर्ण सोबती आहे.
एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प, एलईडी टेल लॅम्‍प्‍स आणि इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ‘एचआयसीएल – हिरो इंटेलिजण्‍ट कॉर्नरिंग लाइट’ असलेले उत्‍सावर्धक लायटिंग पॅकेज स्‍कूटरला लक्षवेधक उपस्थिती देतात. सिग्‍नेचर एच पोझिशन हेड व टेल लॅम्‍प्‍स विशिष्‍ट वैशिष्‍ट्य, एकसमान इल्‍यूमिनेशन व सुधारित राइडर सुरक्षिततेची खात्री देतात. अधिक मोठे व अधिक रूंद टायर्स, डायमंड कट अलॉई व्‍हील्‍स, इंटीग्रेअेड रिअर ग्रिप स्‍कूटरच्‍या विशिष्‍ट वैशिष्‍ट्यामध्‍ये अधिक भर करतात.

Hero Xoom 110 इंजिन

हिरो झूममध्‍ये ११० सीसी बीएस-६ प्रमाणित इंजिन आहे, जे उच्‍च कार्यक्षम राइडसाठी ७२५० आरपीएममध्‍ये ८.०५ बीएचपी आऊटपुट आणि ५७५० आरपीएममध्‍ये ८.७ एनएम टॉर्कची निर्मिती करते. कार्यक्षमता व आरामदायीपणाच्‍या ब्रॅण्‍ड वचनाला कायम राखत नवीन हिरो झूममध्‍ये सुधारित सोयीसुविधा व उच्‍च इंधन कार्यक्षमतेसाठी आय३एस पेटेंटेड तंत्रज्ञान आहे. स्‍कूटर त्‍वरित अॅक्‍सेलेरेशन आणि प्रत्‍येक वेळी पॉवर-ऑन-डिमांड देते.

लक्षवेधक कलर थीम्‍स

हिरो झूम पाच स्‍पोर्टी, आकर्षक व लक्षवेधक रंग पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे. शीट ड्रम व्‍हेरिएण्‍ट पोलस्‍टार ब्‍ल्‍यूमध्‍ये उपलब्‍ध आहे, कास्‍ट ड्रम व्‍हेरिएण्‍ट पोलस्‍टार ब्‍लयू, ब्‍लॅक व पर्ल सिव्‍हलर व्‍हाइटमध्‍ये उपलब्‍ध आहे. कास्‍ट डिस्‍क व्‍हेरिएण्‍ट पोलस्‍टार ब्‍ल्‍यू, ब्‍लॅक, स्‍पोर्टस् रेड आणि मॅट अॅब्रॅक्‍स ऑरेंज कलर थीम्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp today launched the new 110cc scooter xoom pdb
First published on: 30-01-2023 at 20:03 IST