Hero देशातील एक दुचाकींचे उत्पादन करणारी कंपनी आहे. हिरो मोटारसायकल कंपनीने भारतात आपली नवीन बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या बाईकचे नाव आहे Passion Plus. ही बाईक नवीन अवतारामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकची किंमत, फीचर्स आणि इंजिन याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. तसेच ही बाईक कोणाशी स्पर्धा करणार हे पाहुयात.

भारतीय बाजारपेठेत तीन वर्षानंतर कंपनी या मॉडेलचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. BS6 Norms लागू झाल्यापासून २०२० च्या सुरूवातीला या बाईकची विक्री बंद करण्यात आली होती. देशामध्ये हिरो पॅशन प्लस बाईक ७५,१३१ रुपयांमध्ये (एक्स शोरूम, दिल्ली) लॉन्च करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
Whatsapp New Feature Search Messages by Date Marathi News
WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!
side effects of vitamin B3
‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा
Mohammed Shami's social media post after surgery
Mohammed Shami : ‘बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी…’, शस्त्रक्रियेनंतर शमीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

हेही वाचा : होंडा Elevate की मारुती सुझुकी Grand Vitara; यांपैकी कोणती कार फीचर्समध्ये आहे बेस्ट? जाणून घ्या..

पॅशन प्लसमध्ये काय आहे नवीन ?

हिरो पॅशन प्लसचे लेटेस्ट एडिशनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास बऱ्याच प्रमाण जुन्या मॉडेल सारखेच आहे. मात्र या बाईकच्या बॉडी पॅनलवर काही नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत. पॅशन प्लसची नवीन सिरीज Sports Red, Black Nexus Blue आणि Black Heavy Grey या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाईकच्या हार्डवेअरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास बाईकच्या मागील बाजूस टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग लोडेड शॉक अ‍ॅब्जॉर्बर्स मिळतात. बाईकला कंट्रोल करण्यासाठी IBM सह ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

इंजिन आणि मायलेज

लेटेस्ट हिरो पॅशन प्लसमध्ये सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीवर आधारित ९७.२ सीसीचे इंजिन दिले आहे. जे ७.९ बीएचपी पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशनसाठी या इंजिनला ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. कंपनीने या नवीन बाईकच्या मायलेजबद्दल खुलासा केलेला नाही.

हेही वाचा : बीएमडब्लूने भारतात लॉन्च केली नवीकोरी BMW M2 हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्स कार; बुकिंगला झाली सुरुवात, किंमत आहे..

किंमत आणि स्पर्धा

नवीन हिरो पॅशन प्लसला भारतात तीन रंगांमध्ये पर्यायांसह सिंगल व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये याची एक्स शोरूम किंमत ७५,१३१ रुपये आहे. पॅशन प्लस लेटेस्ट एडिशन बाजारात उपलब्ध असलेल्या होंडा शाईन १००, टीव्हीएस रेडियन, बजाज प्लॅटिनासारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल.