Hero Splendor Plus New Price : हीरो स्प्लेंडर प्लस ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. एकाच महिन्यात या बाईकच्या तीन लाखांहून अधिक युनिट्स विकल्या जातात. बाईकची एक्स-शोरूम किंमत ७५,४४१ रुपयांपासून सुरू होते. कमी किंमत, सिम्पल डिझाइन व जबरदस्त इंजिन या वैशिष्ट्यांमुळे सर्व वयोगटांतील व्यक्ती ही बाईक चालवणे पसंत करतात. पण, आता ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा थोडा अधिक मोकळा करावा लागणार आहे. कारण- नवीन वर्ष सुरू होताच कंपनीने या बाईकच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही किंमत नेमकी किती रुपयांनी वाढणार ते जाणून घेऊ…

हीरो स्प्लेंडर प्लस महागली (Hero Splendor Plus Price Hike)

हीरो स्प्लेंडर प्लसची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत यापूर्वी ७५,४४१ रुपयांपासून होती. आता कंपनीच्या वेबसाइटवरील किमतीनुसार हीच किंमत १,७३५ रुपयांनी वाढली आहे. त्यानंतर आता या बाईकची किंमत ७७,१७६ रुपयांपासून सुरू झाली आहे. पण, तुमच्या माहितीसाठी देशातील कोणत्या राज्यांत या बाईकची किंमत का आहे पाहू…

22.91 lakh vehicles sold in January says FADA report
जानेवारीमध्ये २२.९१ लाख वाहनांची विक्री – फाडा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Financial provisions in Union Budget affect the wooden toy business in Sawantwadi
विश्लेषण : अर्थसंकल्पातील तरतूद लाकडी खेळणी उद्योगाला तारेल?
Godrej Consumer shares beneficiary
ससा-कासवाची गोष्ट : ‘गोदरेज कन्झ्युमर’चा शेअर अर्थसंकल्पाचा लाभार्थी ठरेल?
Accident
Accident : बाईकवर स्टंट करणाऱ्याला वाचवताना घात झाला, कारची ५ वेळा पलटी; कुंभमेळ्यावरून परतणारे ५ नेपाळी भाविक ठार
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ

हीरो स्प्लेंडर प्लस : इंजिन आणि मायलेज

हीरो स्प्लेंडर प्लस बाईकमध्ये 100cc एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर व OHC इंजिन आहे. ही बाईक ५.९ kW पॉवर आणि ८.०५ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. या बाईकला इंजिनासोबत प्रोग्राम्ड इंधन इंजेक्शन सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळे ती अधिक चांगले मायलेज देते. ही बाईक एका लिटरमध्ये ७० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. तसेच या बाईकमध्ये ९.८ लिटरच्या इंधनाची टाकी देण्यात आली आहे.

हीरो स्प्लेंडर प्लसमध्ये चार व्हेरियंट्स आहेत. बाईकची डिझाइन सिंपल असली तरी त्यात वेगळे ग्राफिक्स प्रिंट वापरण्यात आल्या आहेत. या बाईकच्या फ्रंट आणि रियर बाजूस १३० मिमी ड्रम ब्रेक आहेत. बाईकमध्ये किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टची सुविधा आहे. स्प्लेंडर प्लसचे वजन ११२ किलोग्रॅम आहे. त्यामुळे रोजच्या वापरासाठी ही बाईक चांगली असल्याचे मानले जाते.

या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर आहे. त्यामध्ये तुम्हाला रिअल टाईम मायलेजची माहिती मिळेल. त्याशिवाय त्यात ब्ल्यूटूथ, कॉल, एसएमएस व बॅटरी अॅलर्टची सुविधा आहे. एवढेच नाही, तर त्यात यूएसबी पोर्ट असेल; ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता. त्यामुळे Hero Splendor Plus बाईकची थेट Honda Shine 100 शी स्पर्धा आहे.

Story img Loader