तुम्हाला कमी बजेटमध्ये लांब मायलेज असलेली स्टायलिश बाइक घ्यायची आहे? पण तुमच्या बजेटनुसार बाइक निवडताना अडचण येत असेल, तर तुम्ही कमी बजेटमध्ये येणाऱ्या दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या गाड्या दिसायला आकर्षक आणि लांब मायलेज देतात. या तुलनेसाठी आमच्याकडे Hero Splendor Plus आणि Honda CD 110 Dream बाइक आहेत. या दोन्ही बाईकच्या किंमतीपासून ते फीचर्सची माहिती जाणून घ्या.

Hero Splendor Plus: हिरो स्प्लेंडर प्लस ही त्यांच्या कंपनीची तसेच १०० सीसी सेगमेंटची एक लोकप्रिय बाइक आहे. कंपनीने चार प्रकारांसह बाजारात लाँच केली आहे. हिरो स्प्लेंडर प्लस बाइकमध्ये सिंगल सिलेंडर ९७.२ सीसी इंजिन आहे, जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. बाइकचे इंजिन ८.०२ पीएसची कमाल पॉवर आणि ८.०५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ज्याला ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने या बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सचे संयोजन दिले आहे. यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर वापरले गेले आहेत. मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, ही बाइक ८०.६ किमीचा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची सुरुवातीची किंमत ६५,६१० रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी टॉप व्हेरियंटवर ७०,७९० रुपयांपर्यंत जाते.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल

गाड्यांमधील ज्वलनशील इंजिनावर बंदी घालण्यास ‘या’ देशाचा नकार

Honda CD 110 Dream: होंडा सीडी ११० ड्रीम बाइक ही एक स्टायलिश बाइक आहे. कंपनीने नुकतीच अपडेट केली असून या बाइकचे तीन प्रकार बाजारात लाँच केले आहेत. बाइक १०९.५१ सीसी सिंगल सिलिंडर इंजिनने इंधन इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. ८.७९ पीएस पॉवर आणि ९.३० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन स्थापित केले आहे, ज्यामध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाइक ७४ किमी प्रति लिटर एवढा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. होंडा सीडी ११० ड्रीम बाइकची सुरुवातीची किंमत ६६,०३३ रुपये (एक्स-शोरूम) आहे जी टॉप व्हेरियंटमध्ये ६८,४८७ रुपयांपर्यंत जाते.