हिरोच्या दोन दुचाकींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती; एका महिन्यात विकल्या ४ लाख गाड्या

देशात दुचाकी व्यवसायात हिरो मोटोकॉर्पचं नाव आघाडीवर आहे. कंपनी ग्राहकांसाठी एकापेक्षा एक आकर्षक मॉडेल सादर करते.

Splendor
हिरोच्या दोन दुचाकींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती; एका महिन्यात विकल्या ४ लाख गाड्या (Photo- Hero Motocorp)

भारतात दुचाकींना सर्वाधिक मागणी आहे. कमी किंमत, चांगला मायलेज आणि देखभाल खर्च कमी असलेल्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते. देशात दुचाकी व्यवसायात हिरो मोटोकॉर्पचं नाव आघाडीवर आहे. कंपनी ग्राहकांसाठी एकापेक्षा एक आकर्षक मॉडेल सादर करते. मात्र हिरो स्प्लेंडर आणि एचएफ डिलक्स या दोन गाड्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या दोन मोटरसायकल काही व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अ‍ॅडव्हान्स फिचर, चांगला मायलेज आणि देखभाल खर्च कमी असल्याने ग्राहक डोळे बंद करून या गाड्या खरेदी करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने या व्हेरियंटच्या ४ लाखाहून अधिक गाड्या विकल्या.

ऑक्टोबर महिन्यात कंपनीने स्प्लेंडरच्या एकूण २,४२,९९२ युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात २,४३,४०७ युनिट्स होती. दुसरीकडे, कंपनीने देशांतर्गत बाजारात ऑफर केलेली सर्वात स्वस्त बाइक असलेली HF Deluxe ला लोकांची पसंती मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने एकूण १,६४, ३११ युनिट्सची विक्री केली आहे. या दोन्ही मोटरसायकलना अवघ्या एका महिन्यात ४ लाखांहून अधिक खरेदीदार मिळाले आहेत.

आता उबेर कॅब व्हॉट्सअ‍ॅपवरून बुक करू शकता; जाणून घ्या

Hero Splendor प्लस ही कंपनीचीच नव्हे तर देशातील सर्वात जास्त विक्री होणारी बाइक आहे. कंपनीने यामध्ये ९७.२ सीसीचे फ्युएल इंजेक्टेड इंजिन वापरले आहे. जे ८.०१ पीएसची पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्ससह येते. फिचर्सचा विचार करता, तुम्हाला बेसिक लाइटिंग सिस्टमसह एक अ‍ॅनालॉग कन्सोल मिळेल. कंपनीचे आयकॉनिक आयताकृती हेडलाईट, डबल क्रॅडल फ्रेम, पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस ट्विन शॉक सस्पेन्शन देण्यात आले आहेत. एक्स शोरुम किंमत ६४,८५० ते ७०७१० रुपये आहे. गाडीचा मायलेज ६५ ते ७० किमी प्रतिलीटर आहे. हिरो मोटोकॉर्पने अलीकडेच सर्वात स्वस्त बाईक HF 100 देशांतर्गत बाजारात लॉन्च केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत फक्त ४९,९०० रुपये आहे. HF Deluxe व्हेरियंटच्या तुलनेत सुमारे १३०० रुपयांनी स्वस्त आहे. डिलक्स मॉडेलच्या किमती रु.५०,७०० रुपयांपासून सुरू होतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hero two bikes are popular among consumers 4 lakh vehicles sold in one month rmt

ताज्या बातम्या