तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या स्पोर्ट बाइकला मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये बाइकचे कमी पर्याय असूनही तरुणांकडून सर्वाधिक पसंती असते. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली स्पोर्ट बाइक घ्यायची असेल, तर दोन टॉप स्पोर्ट्स बाइक्सची संपूर्ण माहिती देणार आहोत. या तुलनेसाठी आमच्याकडे Hero Xtreme 160R आणि Yamaha FZS FI V3 बाइक्स आहेत. तुम्हाला या दोन बाइकच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hero Xtreme 160R: कंपनीची लोकप्रिय स्पोर्ट बाइक आहे. कंपनीने चार प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात १६३ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे एअर-कूल्ड फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १५.२ पीएस पॉवर आणि १४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये, त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. सिंगल चॅनल एबीएस सिस्टम देण्यात आली आहे. मायलेजबाबत, हिरोचा दावा आहे की ही बाइक ५५.४७ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. Hero Xtreme 160R ची सुरुवातीची किंमत १.११ लाख रुपये असून टॉप व्हेरियंटवर १.१६ लाखांपर्यंत जाते.

Komaki Ranger: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक सिंगल चार्जमध्ये धावते २०० किमीपर्यंत; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Yamaha FZS FI V3: कंपनीने ही स्पोर्ट्स बाइक आकर्षक डिझाइनसह दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात १४९ सीसीचा सिंगल सिलेंडर आहे जो एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १२.४ पीएस पॉवर आणि १३.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करत असून ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत, यात सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. बाईकच्या मायलेजबद्दल, यामाहाचा दावा आहे की, गाडी ५५.४२ किमीचा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. Yamaha FZS FI V3 ची सुरुवातीची किंमत १.१४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटवर १.१८ लाख रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero xtreme 160r vs yamaha fzs fi v3 sport bike features and price rmt
First published on: 25-01-2022 at 14:11 IST