दुचाकी वाहनांच्या स्कुटर सेगमेंटमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा ही सर्वांत लोकप्रिय आणि विश्वासार्ह स्कुटर आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी (Honda Activa 6G) देशातील बेस्ट सेलिंग स्कुटर ठरली आहे. ही स्कुटर आतापर्यंत तीन व्हेरिएंटमध्ये बाजारात लॉंच करण्यात आली आहे. आज आपण या तीन व्हेरिएंटमधील डीलक्स या व्हेरिएंटबद्दल जाणून घेऊया.

होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी डीलक्स या स्कुटरची मुंबईतील एक्सशोरूम किंमत ७६,७०५ रुपये इतकी आहे, तर तिची ऑन रोड किंमत ९१,३१९ रुपये इतकी असू शकते. मात्र तुम्ही केवळ नऊ हजार रुपये देऊन ही गाडी आपल्या घरी घेऊन येऊ शकता.

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
IPL 2024 Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Instagram Post Goes Viral
IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

Photos : २०२३ च्या स्वागतासाठी Tata Motors सज्ज; पाहा आगामी नव्या गाड्यांची संपूर्ण लिस्ट!

Honda Activa 6G DLX मधील फीचर्स

कंपनीने होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी डीलक्समध्ये १०९.५१ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७.७९ पीएसची पॉवर आणि ८.८४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, या इंजिनसह ऑटोमैटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मायलेजच्या बाबतीत कंपनीचा असा दावा आहे की ही स्कुटर प्रतिलीटर ६० किमीचे मायलेज देते. हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. त्याचबरोबर, या स्कुटरच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासह स्पोक व्हील आणि ट्यूबलेस टायरही जोडण्यात आले आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर

Honda Activa 6G DLX फायनान्स प्लॅन

या सणासुदीच्या मोसमात होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी विकत घेण्यासाठी तुम्ही लोन घेणार असाल तर बँकेकडून तुम्हाला या स्कुटरसाठी ७७,४३६ रुपयांचे लोन मिळू शकते. यावर ९.७% प्रतिवर्ष या दरानुसार व्याज भरावे लागेल. हे लोन मिळाल्यानंतर तुम्ही केवळ ९ हजार रुपये डाउन पेमेंट म्हणून भरावे लागतील. यानंतर प्रति महिना तुम्हाला २,४८८ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या लोनची पूर्तता करण्याचा अवधी ३ वर्षांचा आहे.

(वरील दर सूचक आहेत. त्यात जीएसटी आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्याजवळील शोरूममध्ये संपर्क साधा.)