दुचाकी क्षेत्रामध्ये मायलेज स्कूटरची मागणी सर्वाधिक आहे आणि बाजारपेठेचा हा ट्रेंड लक्षात घेऊन ऑटोमेकर्स त्यांच्या सध्याच्या स्कूटर रेंज अपडेट करत आहेत. ज्यामध्ये आम्ही Honda Activa 6G H Smart बद्दल बोलत आहोत, जो कंपनीने अलीकडेच रिमोट स्टार्ट फीचरसह सादर केला आहे. आता तुम्ही रिमोटवरूनच स्कूटर लॉक, अनलॉक आणि सुरू करू शकाल. आज आम्ही तुम्हाला Honda Activa 6G H Smart, सोप्या डाउन पेमेंटसह कसे खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.

Honda Activa 6G H Smart स्कूटर किंमत

Activa 6 GH च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ते ८०,५३७ एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे आणि दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत ९३,३८२ आहे. आता तुम्ही ते सुलभ फायनान्स प्लॅनवर देखील घेऊ शकता.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

Honda Activa 6G H Smart स्कूटर फायनान्स प्लॅन

ही स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ११,००० रुपये डाउन पेमेंट करावे लागेल. जर तुम्ही हे फायनान्स ऑन-रोड किंमतीत घेतले तर रु. ८२३८२ चे कर्ज ९.७ टक्के व्याजदराने मिळेल. यासोबतच तुम्हाला ३६ महिन्यांसाठी २६४७ रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

(हे ही वाचा : संधी गमावू नका! भारतीय बाजारात धुमाकूळ घालणारी स्कूटर फक्त १० हजारात आणा घरी, 64 kmpl मायलेज )

नवीन टेक्नॉलॉजीचा वापर

या स्कुटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी असल्याचा दावा होंडा कंपनीने केला आहे. यामध्ये ११० सीसीचे PGM-FI इंजिन येते. फ्युएल इंजेक्शन, स्मार्ट टंबल टेक्नॉलॉजी , एसीजी स्टार्टर असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. Honda Activa H-Smart या स्कूटरमध्ये लांब आकाराचे व्हालीबेस, फुटबोर्ड, पासून स्विच आणि DC LED हेडलॅम्प मिळतात. या स्कुटरमध्ये १२ इंचाचे फ्रंट अलॉय व्हील आणि टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन येते.

या स्कुटरमध्ये नवीन स्मार्ट फाईंड फिचर असल्याचा दावा वाहन निर्मात्याने केला आहे. स्मार्ट की चा वापर करून स्कुटरचे इंजिन दोन मीटरच्या आतमध्ये असताना सुरु करता येते. यामध्ये इंजिनला स्टार्ट आणि स्टॉप असा स्विच देखील येतो.