Honda Activa 6G Vs TVS Jupiter: सर्वोत्कृष्ट मायलेज स्कूटरची दीर्घ श्रेणी बाजारात उपलब्ध आहे, ज्यामध्ये आज आम्ही तुम्हाला देशातील दोन सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरचा तुलनात्मक अहवाल सांगत आहोत. या दोन्ही स्कूटर्सना त्यांची किंमत, मायलेज आणि डिझाइनसाठी पसंती दिली जाते. आज आमच्याकडे टू व्हीलर तुलना अहवालात Honda Activa 6G Vs TVS Jupiter आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळेल की किंमत, मायलेज आणि इंजिनच्या संदर्भात कोणता चांगला पर्याय तुमच्यासाठी असू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणती असेल तुमच्यासाठी खास…

Honda Activa 6G

Honda Activa 6G ही कंपनीची तसेच देशात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. त्याचे तीन व्हेरियंट कंपनीने आतापर्यंत बाजारात लाँच केले आहेत. या स्कूटरची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम, दिल्ली) ७३,०८६ रुपये ते ७६,५८७ रुपये आहे.

Meet the man who invented #hashtags
हॅशटॅग या संकल्पनेच्या मागे कोण? हॅशटॅग नक्की कुणी बनवला? जाणून घ्या रंजक गोष्ट
Your name is not in the voter list
विश्लेषण : मतदार यादीत तुमचं नाव नाही? मग हा लेख वाचा आणि तयारीला लागा
How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
how to choose career after 12th
बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…

Honda Activa 6G इंजिन
स्कूटरमध्ये १०९.५१ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ७.७९ पीएस पॉवर आणि ८.८४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे.

(हे ही वाचा : 13 Seater Car: Tata, Mahindra नाही तर ‘ही’ कंपनी घेऊन आली 13 Seater Car; शानदार फीचर्सवाल्या कारची किंमतही कमी)

Honda Activa 6G मायलेज
Honda Activa 6G च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही, स्कूटर एक लिटर पेट्रोलवर ६० किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

TVS ज्युपिटर

TVS ज्युपिटर ही कमी किमतीत दीर्घ मायलेजचा दावा करणारी स्कूटर आहे, जी तिच्या कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर आहे आणि देशातील दुसरी सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने आतापर्यंत या स्कूटरचे सहा व्हेरियंट बाजारात आणले आहेत. TVS Jupiter ची सुरुवातीची किंमत ६९,९९० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टॉप व्हेरिएंटवर जाताना, ही किंमत ८५,२४६ रुपयांपर्यंत वाढते.

(हे ही वाचा : Car Finance Plan: कार घेण्याचा विचार करताय? ‘ही’ दमदार मायलेजवाली कार आणा फक्त ७५ हजारात घरी; एवढा बसेल EMI )

TVS ज्युपिटर इंजिन
TVS ज्युपिटरमध्ये सिंगल सिलेंडर १०९.७ सीसी इंजिन आहे. हे इंजिन ७.८८ PS पॉवर आणि ८.८ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनचे ट्रान्समिशन स्वयंचलित आहे.

TVS ज्युपिटर मायलेज
TVS मोटर्सचा दावा आहे की ही, ज्युपिटर स्कूटर ६४ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते जी ARAI ने प्रमाणित केली आहे.