Honda Cars India आपल्या SUV कार्सच्या प्रभागामध्ये एका नव्या कारचा समावेश केला आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी मध्यम आकाराच्या Honda Elevate SUV कारवर काम करत आहेत. ही कार आज ६ जून रोजी भारतात ग्लोबल लॉन्च होणार आहे. Honda City आणि Amaze sedans या दोन कार्सनंतर ही नवी कार होंडा कंपनीच्या कार उत्पादकाच्या श्रेणीतील तिसरी कार आहे असे म्हटले जात आहे. चला तर मग या नव्या कारबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात..

Honda Elevate SUV: स्टायलिंग आणि फीचर्स

होंडा कंपनीच्या या नव्या SUV कारमध्ये परदेशात विकल्या जाणाऱ्या HR-V आणि CR-V या कार्सच्या डिझाइन्सवरुन प्रेरणा घेतली आहे. यात Butch appeal असून त्याची लांबी सुमारे 4.2-4.3 मीटर असू शकते. होंडा ही भारतातील लोकप्रिय कार निर्मिती कंपन्यापैकी एक असल्याने ग्राहकांचे कारच्या लॉन्चवर लक्ष आहे. होंडाच्या इतर कार्सप्रमाणे ही चारचाकी कार सुद्धा उत्तम सर्व्हिस देईल अशी लोकांना आशा आहे. Honda Elevate SUV मध्ये level-2 ADAS (अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम), कनेक्टेड कार फंक्शनॅलिटी, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इलेक्ट्रिक सनरूफ असे काही स्पेशल फीचर्स आहेत.

Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Cambodia Cyber Slaves
कंबोडियात ५ हजार भारतीयांना बनवलं ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींचा घोटाळा?

Honda Elevate SUV: इंजिन आणि गिअरबॉक्स

होंडा एलिव्हेट एसयूव्ही ही कार सिटी मिड-साईज सेडानसह पॉवरट्रेन शेअर करते. यामध्ये 121 bhp 1.5 लीटर नॅचरली-अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि CVT ला जोडलेले असेल. या कारमध्ये 1.5-लीटर अ‍ॅटकिन्सन सायकल पेट्रोल स्ट्राँग हायब्रीड युनिट दोन इलेक्ट्रिक मोटर्सला संलग्न असू शकते असे म्हटले जात आहे. हे यूनिट e-CVT शी जोडलेले असू शकते.

आणखी वाचा – मुंबई, पुणे सारख्या महानगरात ट्रॅफिक जाममध्ये न अडकण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या Key Tips; जाणून घ्या सविस्तर

Honda Elevate SUV: किंमत

होंडाच्या या मध्यम आकाराच्या SUV कारच्या लॉन्चच्या वेळी त्याची किंमत जाहीर केली जाणार आहे. ही कार ऑगस्ट महिन्यापर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध होऊ शकते अशी शक्यता वर्तणवण्यात येत आहे. Financial express ने दिलेल्या माहितीनुसार कारची किंमत १० ते १८ लाख रुपयांमध्ये असू शकते असे म्हटले जात आहे. Honda Elevate ही कार Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara या कार्संना टक्कर देऊ शकते असा दावा लोक करत आहेत.