Premium

Honda च्या ‘या’ कार्स स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी! तीन दिवसांनी महागणार किंमत

Elevate ही कंपनीची नवीन माध्यम आकाराची एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही ६ जून रोजी लॉन्च केली जाणार आहे.

honda city and honda amaze price hike in june month 2023
होंडा कार्स इंडियाच्या या गाड्यांची किंमत जूनपासून वाढणार (image credit- Financial Express)

Honda ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. होंडा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्स लॉन्च करत असते. मात्र कार्बन मिशन नॉर्म्स (उत्सर्जन मानदंड नियम) लागू झालयावर कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली होती. आता पुन्हा एकदा होंडा कार्स इंडियाने गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने कोणकोणत्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे ते पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होंडा कार्स इंडियाने आपल्या सेडान कार होंडा सिटी आणि होंडा अमेझच्या किंमतीमध्ये जून महिन्यापासून १ टक्क्यांची वाढ होणार आहे. होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष (सेल्स अँड मार्केटिंग) कुणाल बहलने आपल्या निवेदनामध्ये म्हटले, ”खर्चात झालेली वाढ अंशतः भरून काढण्यासाठी आम्ही जून महिन्यापासून सिटी आणि अमेझच्या किंमतीमध्ये १ टक्क्याने वाढ करण्याची योजना आखत आहोत.” ही आधी वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये वेगवेगळी असणार आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडे ने दिले आहे.

हेही वाचा : Nissan ने भारतात लॉन्च केलेली ‘ही’ कार घालणार धुमाकूळ, ११ हजार रुपयांमध्ये करता येणार बुकिंग, जाणून घ्या फीचर्स

होंडा सिटी आणि अमेझच्या किंमती

सध्या होंडा अमेझची किंमत ही ६.९९(एक्सशोरूम, दिल्ली) लाख रुपयांपासून ९.६ लाख रुपयांपर्यंत आहे. तर होंडा सिटीची किंमत ११.५५ (एक्सशोरूम, दिल्ली) लाख रुपयांपासून २०. ३९ लाख रुपयांपर्यंत आहे. मध्यम आकाराच्या सेडानवर हायब्रीड ट्रिम्सच्या किंमती वाढीचा परिणाम होणार नाही.

होंडा सिटी आणि होंडा अमेझ (image credit-loksatta graphics team)

देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) कंपनीने एक घोषणा केली आहे. कंपनीच्या आगामी लॉन्च होणाऱ्या SUV ला Honda Elevate असे नाव देण्याची घोषणा होंडा कंपनीने केली आहे. Elevate ही कंपनीची नवीन माध्यम आकाराची एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही ६ जून रोजी लॉन्च केली जाणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 12:18 IST
Next Story
Nissan ने भारतात लॉन्च केलेली ‘ही’ कार घालणार धुमाकूळ, ११ हजार रुपयांमध्ये करता येणार बुकिंग, जाणून घ्या फीचर्स