scorecardresearch

भारतात लवकरच लाँच होणार Honda City Facelift कार; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Honda Citiy: या नवीन मॉडेलमध्ये कंपनीकडून कोणते बदल करण्यात येणार आहेत ते आपण जाणून घेऊयात.

Honda City facelift
Honda City facelift- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Honda Cars ही एक जपानी कंपनी आहे जी कार्सचे उत्पादन करते. लवकरच ही कंपनी लवकरच सिटी मिड-लाईफ फेसलिफ्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. पाच्या सिरीजची होंडा सिटी जुलै २०२० मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. या नवीन मॉडेलमध्ये कंपनीकडून कोणते बदल करण्यात येणार आहेत ते आपण जाणून घेऊयात.

एका मीडिया रिपोर्टनुसार, होंडा सिटी लवकरच नवीन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपली वाहने सतत अपडेट करत असते. या एप्रिलपूर्वी कंपनी नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करू शकते.

हेही वाचा : फक्त १२ हजारांमध्ये घरी घेऊन या Suzuki ची ‘ही’ जबरदस्त स्कुटर; एका लिटरमध्ये धावणार…

काय होणार बदल ?

एका अहवालांनुसार नवीन येणाऱ्या सिटीच्या मॉडेलमध्ये कॉस्मेटिक आणि मेकॅनिकल बदल असण्याची शक्यता आहे. इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता कमीच आहे. तसेच नवीन अलॉय व्हील्स, ट्वीक केलेले टेललॅम्प, नवीन आणि अपडेटेड फॉग लॅम्प यांसारख्या गोष्टी यात दिसू शकतात. वायरलेस चार्जरचे फिचर सुद्धा यामध्ये दिसू शकते. तसेच इंजिनमध्ये डॉ प्रकार ग्राहकांना बघायला मिळू शकतात. यात १.५ लिटरचे नॅचरल एस्पिरेटेड इंजिन व १.५ लिटरचे अ‍ॅटकिन्सन सायकल पेट्रोल हायब्रीड इंजिन असेल. तसेच ही कार सहा स्पीड मॅन्युअल गिअर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लाँच होईल.

काय असणार किंमत ?

नवीन Honda City ची किंमत सध्याच्या व्हेरिएंटपेक्षा थोडीफार जास्त असू शकते. सध्याच्या होंडा सिटीची (एक्स-शो रूम) किंमत ही ११.८७ लाख रुपयांपासून सुरु होते. यातले टॉप मॉडेल १५.६२ लाख रुपयांना येते. याच्या हायब्रीड व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत (१९.८९) लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 13:42 IST