Honda Cars India ची काही तासांपूर्वी Honda Elevate या त्यांच्या नवीकोरी SUV कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली. मध्यम आकार असलेल्या या कारच्या लॉन्चची घोषणा फार पूर्वीच करण्यात आली होती. होंडा एलिव्हेटबाबत ग्राहकांच्या मनामध्ये खूप उत्साह होता. ही कार भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील Hyundai Creta आणि Kia Seltos या दोन कार्संना टक्कर देईल असे म्हटले जात आहे. Honda Elevate लॉन्च झाल्यानंतर या ३ कार्सपैकी कोणती कार बाकी २ कार्सच्या तुलनेमध्ये अधिक सरस आहे याबाबत लोकांमध्ये चर्चा होत आहे. या मुद्दावर आधारुन आज आपण या ३ SUV कार्सची तुलना पाहणार आहोत.

Elevate, Creta आणि Seltos यांच्या तुलनेमध्ये, किआ सेल्टोसची लांबी ही 4,315mm आहे. लांबीच्या बाबतीत ही कार वरचढ ठरते. उंचीच्या हिशोबाने होंडा एलिव्हेट पुढे आहे. एलिव्हेटची उंची 1,650mm इतकी आहे. या तिघांमध्ये सेल्टोस ही कार सर्वात जास्त रुंद आहे. या कारची रुंदी 1,800mm आहे. तसेच व्हीलबेस आणि बूट स्पेस यांमध्येही होंडा एलिव्हेट दोन्ही कार्सपेक्षा पुढे आहे.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
World Heritage Day 2024 Monuments In India
World Heritage Day 2024: ‘हेरिटेज डे’ म्हणजे काय? ‘या’ यादीतील किती ठिकाणांना दिलीये तुम्ही भेट?
raghuram rajan on narendra modi
“चिप उत्पादकांना अनुदान देण्यापेक्षा…”, रघुराम राजन यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “इथे रोजगार मोठं आव्हान असताना…”
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव
Honda ElevateHyundai Creta
Kia Seltos
Length4,312mm4,300mm4,315mm
Height
1,650mm
1,635mm1,620mm
Width1,790mm1,790mm1,800mm
Wheelbase
2,650mm
2,650mm
2,650mm
Boot space458 litres
433 litres433 litres
(माहिती सौजन्य – indiatoday)

आणखी वाचा – होंडाची बहुचर्चित Honda Elevate जागतिक स्तरावर झाली लॉन्च; ‘या’ महिन्यापासून भारतात होणार Booking ला सुरुवात

Honda Elevate मध्ये १.५ लीटर i-VTEC DOHC पेट्रोल (121PS/145Nm) इंजिन आहे. हे इंजिन 6-स्पीड MT किंवा 7-स्पीड CVT ऑटोमॅटिकसह जोडलेले असू शकते. काही दिवसांनी कारमध्ये अपडेटेड इंजिनचा पर्याय देखील जोडला जाणार आहे. सध्या एलिव्हेटमध्ये हायब्रिड पावरट्रेनचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे. हायब्रीड पॉवरट्रेन नसतानाही या कारची किंमत १० ते १६ लाख या रेंजमध्ये असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(ही माहिती indiatoday.in वरुन घेतलेली आहे.)