Honda Elevate Vs Maruti Suzuki Grand Vitara: अलिकडच्या काळात भारतातील बहुप्रतीक्षित SUV पैकी एक, Honda Elevate ने काल कव्हर तोडले, एक कठीण आणि बॉक्सी दिसणारे मॉडेल दाखवले जे पुढील महिन्यापासून बुकिंगसाठी उपलब्ध होईल आणि या वर्षी सणासुदीच्या हंगामात लॉन्च केले जाईल. 2030 पर्यंत जपानी कार निर्मात्याने भारतीय बाजारपेठेसाठी योजलेल्या पाच SUV पैकी एक म्हणून Honda Elevate येते.

Honda India ने नुकतीच त्यांची बहुचर्चित Honda Elevate ही SUV कार लॉन्च केली. पुढच्या महिन्यामध्ये या कारच्या बुकिंगला सुरुवात होणार असून सणासुदीच्या हंगामामध्ये ती भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार आहे. २०३० पर्यंत होंडा कंपनीच्या 5 टॉप बेस्ट SUV भारतामध्ये लॉन्च होणार आहेत. त्यातील एक कार म्हणजे Honda Elevate होय.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
man made three different dishes in one vessel at one time video is going viral
VIDEO : गृहिणींनो ‘ही’ पाहा झटपट स्वयंपाकाची सोप्पी ट्रिक; एकाच कुकरमध्ये १० मिनिटांत वरण, भात, भाजी शिजून तयार
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

Hindustan times ने दिलेल्या माहितीनुसार, एलिव्हेट ही होंडा कंपनीच्या सध्याच्या प्रमुख प्रोडक्ट्सपैकी एक आहे. ही कार भारतामध्ये लॉन्च झाल्यावर Maruti Suzuli Grand Vitara, Hyundai Creta आणि Kia Seltos यांसारख्या SUV कार्संना टक्कर देऊ शकते असे म्हटले जात आहे. या कार्सपैकी मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि होंडा एलिव्हेट या दोन कार्सची स्पेसशीट-आधारित तुलना आपण आज पाहणार आहोत.

Honda Elevate vs Maruti Suzuki Grand Vitara: डायमेंशन

आकारमानानुसार, होंडा एलिव्हेटची लांबी 4,312 mm, रुंदी 1,790 mm आणि उंची 1,650 mm आहे. यात 2,650 mmचा व्हीलबेस देखील आहे. याउलट मारुती सुझुकी ग्रँड विटारा या SUV कारची लांबी 4,345 मिमी, रुंदी 1,795 मिमी आणि उंची 1,645 मिमी आहे. या कारचा व्हीलबेस 2,600 mm आहे.

आणखी वाचा – बीएमडब्लूने भारतात लॉन्च केली नवीकोरी BMW M2 हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्स कार; बुकिंगला झाली सुरुवात, किंमत आहे..

Honda Elevate vs Maruti Suzuki Grand Vitara: पावरट्रेन

सिंगल पावरट्रेन ऑप्शनसह Honda Elevate ही कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये 1.5-लीटर DOHC i-VTEC पेट्रोल इंजिन आहे. त्याला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पर्याय म्हणून CVT जोडलेला आहे. हे इंजिन 120 bhp पीक पॉवर आणि 145 Nm कमाल टॉर्क तयार करते. एलिव्हेटसह होंडा सिटी मिडसाईज सेडानमध्येही या इंजिनचा समावेश आढळतो.

आणखी वाचा – कार बाईकसाठी बेस्ट काय, नॉर्मल पेट्रोल की पॉवर पेट्रोल? फरक काय व तुम्ही कशामुळे पैसे वाचवू शकता

दुसऱ्या बाजूला मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आहे. यात 1,462 cc आणि 1,490 cc असे दोन वेगवेगळ्या डिस्प्लेसमेंट्सचा समावेश आहे. या मॉडेलमध्ये सीएनजी आणि हायब्रिड ऑप्शन आहेत. या SUV ला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ई-सीव्हीटीचे ट्रान्समिशन पर्याय मिळतात. कारमधील 1,462 cc पेट्रोल इंजिन 101 bhp पीक पॉवर आणि 136.8 Nm कमाल टॉर्क निर्माण करते. तर 1,490 cc इंजिनमुळे 91.18 bhp पीक पॉवर आणि 122 Nm टॉर्क आउट तयार होतो.