दुचाकी क्षेत्राच्या स्कुटर सेगमेंटमध्ये आता वेगवेगळे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणाऱ्या बऱ्याच स्कुटर उपलब्ध आहेत. बाईक सेगमेंटप्रमाणे तुम्हीसुद्धा एक स्टायलिश स्कुटर घेण्याचा विचार करत आहेत, परंतु योग्य निवड करू शकत नसाल तर या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय स्कूटर्सची संपूर्ण माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीव्हीएस एनटॉर्क (TVS Ntorq) आणि होंडा ग्राझीया (Honda Grazia) या आपापल्या कंपनीच्या बेस्ट सेलिंग स्कुटरच्या लिस्टमध्ये येतात. येथे आपण या दोन्ही स्कुटरची किंमत, फीचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशनबद्दल माहिती करून घेणार आहोत.

ओला अ‍ॅप अंतिम पेमेंटसाठी कधी खुले होणार आणि कधी मिळणार ओला इलेक्ट्रिक स्कुटर? जाणून घ्या तारीख

टीव्हीएस एनटॉर्क (TVS Ntorq) :

टीव्हीएस एनटॉर्क एक स्पोर्टी डिझाईन असलेली वेगवान स्कुटर आहे जिला कंपनीने पाच प्रकारामध्ये बाजारात उतरवलं आहे. या स्कुटरमध्ये १२४.८ सीसीचे एकमेव सिलेंडर आहे जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १०.२ पीएसची पॉवर आणि १०.८ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. याच्यासोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले गेले आहे. स्कुटरच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये कंपनीने याच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हीलमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे.

ही स्कुटर ५६.२३ किलोमीटर प्रतिलिटरचा मायलेज देते असा दावा कंपनीने केला असून हे मायलेज एआरएआय द्वारा प्रमाणित आहे. टीव्हीएस एनटॉर्कची सुरुवातीची किंमत ७५,४४५ रुपये आहे. तर, टॉप व्हेरिएंटपर्यंत या स्कुटरची किंमत ८७,५५० रुपये इतकी होते.

होंडा ग्राझीया (Honda Grazia) :

होंडा ग्राझीया ही आपल्या कंपनीची लोकप्रिय स्कुटर असून कंपनीने तीन प्रकारात ही लॉंच केली आहे. या स्कुटरच्या इंजिनची पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये एकमेव सिलेंडर असलेले १२४ सीसीचे इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२५ पीएसची पॉवर आणि १०.३ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यांच्यासोबतच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे. स्कुटरच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. यासोबतच अलॉय व्हील आणि ट्युबलेस टायर लावण्यात आले आहेत.

सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च

ही स्कुटर ४९ किलोमीटर प्रतिलिटरचा मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे मायलेज एआरएआय द्वारा प्रमाणित आहे. होंडा ग्राझीयाची सुरुवातीची किंमत ७८,३८९ रुपये असून टॉप व्हेरिएंटपर्यंत या स्कुटरची किंमत ८७,६६८ रुपयांपर्यंत जाते.

More Stories onहोंडाHonda
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda grazia vs tvs ntorq know which one is better in price style mileage pvp
First published on: 22-01-2022 at 12:48 IST